गिरणा धरण ओव्हरफ्लो; 1500 क्युसेसने पाणी सोडणार

दीपक कच्छवा 
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या झपाट्याने वाढ होत आहे.

मेहुणबारे (जळगाव) : गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या झपाट्याने वाढ होत आहे. आजचा पाणीसाठा 100% पर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे आज सकाळी नऊ वाजता 1500 क्युसेस पाणी सोडण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

गिरणा धरणात गेल्या दोन ते तीन वर्षानंतर पुन्हा एकदा चांगला जलसाठा झाल्याने गिरणा पट्ट्यातील शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाली असून धरणातून एवढ्या साठ्यावर किमान चार आवर्तने तरी मिळू शकतात त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षापासून बारगळलेला रब्बी हंगाम यावर्षी पूर्ण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील गावांसह, जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्ट्यात असणाऱ्या अनेक गावातील पिण्याच्या पाण्याबरोबर जलसिंचनाच्या पाण्याचा प्रश्नही 100% सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या गिरणा पट्टा यंदा हिरवाईने  बहरण्यास मदत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girna dam overflows at jalgaon