कृष्णापुरीत अखेर गिरणाचे पाणी 

दीपक कच्छवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

आमदारांचे आभार
कृष्णापुरी धरणात पाणी टाकण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील यांच्याकडे शेतकर्यांनी पाठपुरावा केला होता.त्यावेळी उन्मेष पाटील यांनी देखील कृष्णापुरीत पाणी टाकुच असे आश्वासन दिले होते.त्यामुळे त्यानी या भागातील पाणी प्रश्न सोडविल्याने वरखेडे; कृष्णापुरी, लोंढे, दरातांडा, वरखेडे तांडा या भागातील शेतकर्यांनी आमदार उन्मेष पाटील यांचे आभार मानले आहेत.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) येथील तांड्यासह परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्शवभुमीवर.'गिरणा' चे पाणी 'कृष्णापुरी'त टाका या मथळ्याखाली 'सकाळ' ने वृत्त प्रसिद्ध केले होते.आणि कृष्णापुरी ग्रामस्थांची पाण्याची समस्या सुटेपर्यंत 'सकाळ' ने हा विषय लावुन धरला होता.अखेर या  वृत्ताची दखल घेत. आज कृष्णापुरी धरणात 'गिरणा' चे पाणी टाकले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी 'सकाळ'ला धन्यवाद देत आमदार उन्मेष पाटील यांचे आभार मानले आहेत.

कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) या धरणात पाणीसाठा शिल्लक नसल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी आजही भटकंती होत आहे.त्यांचे पाण्यासाठी  होणारे हाल पाहून 'सकाळ' ने त्यांच्या पाण्याचा प्रश्न लावुन धरला होता.13 मार्चला 'गिरणा' चे पाणी कृष्णापुरीत टाका हे वृत्त टुडे पान एकवर प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर 'सकाळ' ने सातत्याने हा विषय लावुन धरला आहे.या भागातील गुरांना  पिण्यासाठी आजुबाजुला कुठेच पाणी नव्हते.जवळच असलेल्या दरातांडा भागात देखील पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कृष्णापुरी धरणात आज दुपारी सोडण्यात आलेले पाणी तीन दिवस चालले त्यामुळे  आजुबाजुच्या विहीरीच्या पातळीत वाढ होऊन व  परिसरात आज जाणवत असलेली पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.या भागात गुरांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.त्यामुळे कृष्णापुरी धरणात पाणी सोडण्यात आल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एस.आर.पाटील यांनी सकाळ शी बोलताना दिली.

आमदारांचे आभार
कृष्णापुरी धरणात पाणी टाकण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील यांच्याकडे शेतकर्यांनी पाठपुरावा केला होता.त्यावेळी उन्मेष पाटील यांनी देखील कृष्णापुरीत पाणी टाकुच असे आश्वासन दिले होते.त्यामुळे त्यानी या भागातील पाणी प्रश्न सोडविल्याने वरखेडे; कृष्णापुरी, लोंढे, दरातांडा, वरखेडे तांडा या भागातील शेतकर्यांनी आमदार उन्मेष पाटील यांचे आभार मानले आहेत.

'सकाळ' ने केला होता' पाठपुरावा  

13 मार्चला : 'गिरणाचे' पाणी कृष्णापुरीत टाका

14 मार्चला : कृष्णापुरी धरण पडले कोरडेठाक

15 मार्चला : कृष्णापुरी वासीयांसाठी रूपसिंग जाधव ठरले जलदुत

16 मार्च : दरातांडा ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

20 मार्च : पाण्यासाठी शेतकरी आदोलंनाच्या पावित्र्यात

27 मार्च : कृष्णापुरी वासीयांसाचे पाण्यासाठी उपोषण

3 एप्रिल  : कृष्णापुरीत पाणी सोडा ; अन्यथा तहसिलमध्ये गुरे सोडु

6 एप्रिल : कृष्णापुरी पाटचारी ठरली 'शोपीस'

Web Title: girna dam water in chalisgaon