गिरणा धरणात 10 टक्के साठा!

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 30 जून 2018

गतवर्षी जून महिन्यात धरणात 24 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. शिवाय पूर्व मोसमी पावसामुळे धरणाच्या साठ्यात दोन टक्क्यांनी वाढ होऊन 26 टक्क्यांवर साठा गेला होता. यंदा मात्र धरणात नऊ टक्केच पाणी शिल्लक राहिले. त्यात धरण क्षेत्रात झालेल्या थोड्याफार पावसामुळे व अल्प प्रमाणात येणाऱ्या आवकमुळे धरण आज 10 टक्के भरले आहे. 

पिलखोड (ता. चाळीसगाव) : धरणक्षेत्रात झालेला पाऊस व धरणात होत असलेली अल्प आवक यामुळे धरण नऊ टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर पोचले आहे. अशी माहिती उपभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

गतवर्षी जून महिन्यात धरणात 24 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. शिवाय पूर्व मोसमी पावसामुळे धरणाच्या साठ्यात दोन टक्क्यांनी वाढ होऊन 26 टक्क्यांवर साठा गेला होता. यंदा मात्र धरणात नऊ टक्केच पाणी शिल्लक राहिले. त्यात धरण क्षेत्रात झालेल्या थोड्याफार पावसामुळे व अल्प प्रमाणात येणाऱ्या आवकमुळे धरण आज 10 टक्के भरले आहे. 

सध्या धरणात एकूण 4 हजार 821 दशलक्ष घनफुट साठा असून 3 हजार मृतसाठा वगळून 1 हजार 821 एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. शिवाय धरणात 5.51 दशलक्ष घनफुट पाण्याची आवक सूरु आहे. अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Web Title: girna dam water storage