गिरणा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस उतरली रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

चाळीसगाव - शासनाने जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या धोरणाला विरोध करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज गिरणा परिसरातील चाळीसगाव, पाचोरा व भडगाव या तिन्ही शहरांमध्ये आंदोलन करण्यात आले. 

चाळीसगाव - शासनाने जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या धोरणाला विरोध करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज गिरणा परिसरातील चाळीसगाव, पाचोरा व भडगाव या तिन्ही शहरांमध्ये आंदोलन करण्यात आले. 

चाळीसगावात ठिय्या 
चाळीसगावला तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जिल्हा बॅंकेचे माजी संचालक प्रदीप देशमुख आदींच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रदीप सोळंके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासनावर टीकास्त्र सोडले. किशोर पाटील (तमगव्हाण) यांनी मागण्यांची दखल न घेतल्यास, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील असा अशा देत केंद्र शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका केली. तालुक्‍यातील लाभार्थ्यांना विहिरींचा तसेच ठिबकच्या अनुदानाचा लाभ मिळालेला नसून ६२ गावे आजही दुष्काळी अनुदानापासून वंचित असल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याने ग्रामीण भागातील जनतेला अनेक समस्यांना सध्या तोंड द्यावे लागत असल्याचे दिनेश पाटील यांनी सांगितले. पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष शशिकांत साळुंखे यांनीही शासनावर जोरदार टीका केली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनावर दिनेश पाटील, श्‍याम देशमुख, अतुल देशमुख, प्रमोद पाटील, मंगेश पाटील, शिवाजी आमले, विजय जाधव, किशोर पाटील, सुनील देशमुख, प्रशांत पाटील, अजय पाटील, केशवराव वाबळे, ईश्‍वरसिंग ठाकरे, जयाजी भोसले, प्रदीप अहिरराव, राजेंद्र देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आदिनाथ बुधवंत, ग्रामीणचे सुनील देशमुख, वाहतूक शाखेचे सुरेश शिरसाठ यांनी बंदोबस्त ठेवला. 

पाचोऱ्यात रास्ता रोको 
पाचोरा येथे राष्ट्रवादीतर्फे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको व धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांना निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास शिंगाडे मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनप्रसंगी घोषणांनी शहर दणाणले होते. आजचे आंदोलन अत्यंत संयमाने करण्यात आले. 
आमदार दिलीप वाघ व संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली जारगाव चौफुलीवर सुमारे अर्धा तास रास्ता रोको करण्यात आल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी गाड्यांमधून आंदोलनकर्त्यांना पोलिस ठाण्यात आणले. तहसील कार्यालयासमोर सुमारे तासभर धरणे आंदोलन झाले. यावेळी खलिल देशमुख, विकास पाटील, नितीन तावडे, शालीक मालकर, दिलीप वाघ यांची भाषणे झाली. तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. कापूस व मक्‍याला पाच व तीन हजार रुपये भाव मिळावा, शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळावे, उत्पादन खर्चावर आधारित भाव शेतीमालाला मिळावा, नोटाबंदी काळात मृत झालेल्यांच्या वारसांना नोकरी द्यावी, शेतकरी व मजुरांना आर्थिक साहाय्य करावे, चंदू सोनवणे या जवानाची सुटका व्हावी, व्यावसायिकांना भरपाई मिळावी आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. मोदी सरकारच्या धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला. आंदोलनात नितीन तावडे, विकास पाटील, शालिक मालकर, राजेंद्र वाघ, ललित वाघ, भूषण वाघ, खलिल देशमुख, हारून देशमुख, दगाजी वाघ, रणजित पाटील, अरुण पाटील, अझहरखान, बशीर बागवान, नाना देवरे, अय्युब बागवान, भगवान मिस्तरी, महिला आघाडीच्या ज्योती वाघ, सुचेता वाघ, सरला पाटील, सुरेखा पाटील, संध्या बोरसे, रंजना भोसले, मोतीलाल चौधरी, प्रल्हाद पाटील, योगेश पाटील, प्रा. राकेश सोनवणे, दगाजी वाघ, प्रदीप पाटील, सुरेश परदेशी, रमेश पाटील, दादाजी पाटील (लोहटार), वसंत पाटील, रमेश पाटील (तारखेडा), शिवा जाधव, रज्जाक शेख, गनी शेख (नगरदेवळा), संग्राम आढाव, बाळू पाटील, सुदाम वाघ, मुकेश पाटील, सचिन पाटील, आकाश वाघ, गौरव वाघ, करण सूर्यवंशी, सूरज वाघ, रोहित वाणी, ॲड. दीपक पाटील, अशोक मोरे, वासू महाजन, बाबाजी ठाकरे, किशोर देशमुख, बी. एस. पाटील, डॉ. शेखर पाटील, नितीन पाटील, ए. बी. अहिरे, महंमद मिस्तरी, उमेश एरंडे, दीपक कवडे आदी सहभागी झाले होते. खलिल देशमुख यांनी प्रास्ताविक केले. विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सनी वाघ यांनी आभार मानले. 
 

भडगावातही रास्ता रोको 
भडगाव शहरातील पाचोरा चौफुली व बस स्थानकासमोर रस्त्यावर कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत वीस मिनिटे रास्ता रोको केला. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार सी. एम. वाघ व पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या उपस्थितीत माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार दिलीप वाघ यांनी केले. आंदोलनास बस स्थानकासमोरून दुपारी दीडला सुरवात झाली. पाचोरा चौफुलीवर सुमारे वीस मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती. खलिल देशमुख यांनी शासनाविरुद्ध मनोगत व्यक्त केले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तहसील कार्यालयावर कार्यकर्ते आल्यानंतर तहसीलदार श्री. वाघ यांना निवेदन देण्यात आले. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांसह व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. पक्षाच्या आदेशानुसार जनआंदोलन, शिंगाडे मोर्चा काढून शासनाला जाब विचारू असे सांगत माजी आमदार दिलीप वाघ यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. जिल्हा परिषदेचे सदस्य विकास पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, बाजार समितीचे संचालक ॲड. विश्‍वासराव भोसले, कार्याध्यक्ष भय्यासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. जे. डी. शेख यांनी आभार मानले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष भय्यासाहेब पाटील, शहराध्यक्ष रमेश शिरसाठ, युवकचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, शहराध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र परदेशी, नगराध्यक्ष शामकांत भोसले, जिल्हा परिषद सदस्य विकास पाटील, बाजार समितीचे संचालक ॲड. विश्‍वासराव भोसले, दिलीप पाटील, सुरेंद्र मोरे, नगरसेवक सुभाष पाटील, शिवाजीराव पाटील, संदीप चव्हाण, परेश पाटील, भोजराज पाटील, व्ही. एस. पाटील, अरुण सोनवणे, बापूराव पाटील, देवा भिल, विवेक पवार, रवींद्र महाजन, संजय पाटील, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, योगेश महाजन, गणेश जावरे, राजेंद्र पाटील, डॉ. विजयकुमार देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: Girna NCP streets