सक्तीने नव्हे स्वखुषीने करा रुग्णसेवा: प्रकाश आमटे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नाशिक : जीवन यशस्वी होण्यासाठी डॉक्‍टर झाल्यावर किमान वर्षभर खेड्यात सक्तीने नव्हे, तर स्वखुषीने रुग्णसेवेसाठी द्यायला हवीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे झालेल्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते डॉ. आमटे यांना डी. लिट्‌. ही सन्मान्य पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी सन्मानाला उत्तर देताना डॉ. आमटे बोलत होते.

नाशिक : जीवन यशस्वी होण्यासाठी डॉक्‍टर झाल्यावर किमान वर्षभर खेड्यात सक्तीने नव्हे, तर स्वखुषीने रुग्णसेवेसाठी द्यायला हवीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे झालेल्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते डॉ. आमटे यांना डी. लिट्‌. ही सन्मान्य पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी सन्मानाला उत्तर देताना डॉ. आमटे बोलत होते.

विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, डॉ. के. एच. संचेती, डॉ. मंदाकिनी आमटे, कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण आदी उपस्थित होते. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते 42 सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाच्या ई-लर्निंग सेंटरचे उद्‌घाटन झाले.

कुठलेही काम निष्ठेने केल्यावर अडचणींचा पाढा वाचण्याची आवश्‍यकता भासत नाही. बाबा आमटे यांच्या प्रेरणेने रस्ते, वीज, आरोग्यसेवा नसलेल्या हेमलकसा दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवेने सार्वजनिक कामाची सुरवात केली. पीडित, दुःखी, अत्यवस्थ रुग्णांना वाचवल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू प्रेरणादायी ठरले. तीस वर्षे जंगलात राहून कार्य करणाऱ्या "टीम' उत्साहाने कार्यरत राहिली. त्यापैकी कुणाचेही समाधान हिरावून घेऊ शकत नाही, असे सांगत डॉ. आमटे यांनी डॉक्‍टर पेशाच्या झालेल्या धंद्याबद्दल नाराजी व्यक्त केली. डॉक्‍टर पेशाची ही प्रतिमा बदलण्यासाठी नैतीक सेवा करायला हवी, असे सांगून त्यांनी किती कमवायचे हे तुमच्या हातात आहे असे स्पष्ट केले. ते म्हणाले, की दुर्गम भागात गरीबी असली, तरीही बलात्काराची घटना नाही. चोरीचा प्रकार नाही. कुणीही भीक मागत नाही. अशांच्या सहवासात जीवन समृद्ध झाले. शिक्षणाची व्यवस्था केल्याने आदिवासींची मुले डॉक्‍टर, वकील, अभियंता झाले आहेत. शेती व्यवसायाचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर गेली चाळीस वर्षे क्रूर वन्यजीवांच्या सहवासात आनंदाने राहत आहे.
प्रणालीतील बदलाने नाराजी

हुशार विद्यार्थ्यांना डॉक्‍टर होता यावे म्हणून वैद्यकीय शिक्षणाच्या प्रणालीत बदल करण्यात आले. अभिमत विद्यापीठांच्या अडीच हजारांवर जागांच्या प्रवेशाची अनियमितता पाह्यला मिळाल्याने अप्रिय निर्णय घ्यावा लागला. स्वायत्त असल्याच्या थाटात वागणाऱ्यांच्या शुल्कावर निर्बंध आणण्यात आले आहेत. त्यामुळे लोक नाराज झाले आहेत, असे सांगून श्री. महाजन म्हणाले, की खेड्यात आरोग्यसेवा पोचल्या नाहीत. त्यावर उपाय म्हणून वैद्यकीय सेवांसाठीचे बंधपत्र तोडून शुल्क भरण्याची तयारी दर्शवली जात आहे. अशा परिस्थितीत डॉक्‍टर झाल्यावर डॉ. आमटे यांच्यातील सेवाभाव डोळ्यापुढे ठेऊन समाजसेवा करायला हवी.

Web Title: give health service voluntarily, appeals prakash amte

फोटो गॅलरी