अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना नियमित वेतन द्या - सुप्रिया सुळेंना मागणी

Supriya Sule
Supriya Suleesakal

साक्री (जि. धुळे) : शासनमान्य शंभर टक्के अनुदानित वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी मिळावी अशी मागणी धुळे जिल्हा अनुदानित वसतिगृह संघटनेने केली आहे. याविषयी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना जिल्हाध्यक्ष योगेश भामरे यांनी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, सामाजिक न्याय विभागामार्फत शंभर टक्के अनुदानित दोन हजार ३८८ वसतिगृह राज्यात चालविले जातात. त्या वसतिगृहात २४ तास सेवेत कार्यरत कर्मचारी अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, चौकीदार असे आठ हजार १०४ कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी अल्प वेतनावर २४ तास सेवेत कार्यरत असतात. शिवाय ते वेतनही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होते. म्हणून राज्यातील इतर आश्रम शाळा, शासकीय वसतिगृहातील कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘समान काम, समान दाम’ या तत्त्वानुसार वेतनश्रेणी मिळावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश भामरे, जिल्हा महिला अध्यक्ष मालती शिरसाट, खानदेश विभागाचे प्रमुख विकास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Supriya Sule
खाकीतील माणुसकीची प्रचिती; नंदुरबारच्या पोलिसांचे दिव्यांगाला बळ
Supriya Sule
‘महागाई’ मोदी सरकारचे ‘गिफ्ट’ : खासदार सुप्रिया सुळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com