जागतिक बाजारपेठ कवेत घेण्याची भारतीय द्राक्षांत क्षमता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पिंपळगाव बसवंत - प्रयोगशीलता व कष्टाच्या बळावर भारतातील द्राक्ष उत्पादकांनी जगभरात ठसा उमटविला आहे. मागणी असलेले द्राक्ष वाण व एकसारखी द्राक्ष मण्याची फुगवण करण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास भारतीय द्राक्षे जागतिक बाजारपेठ कवेत घेतील, असा विश्‍वास चीनचे द्राक्ष खरेदीदार यू चियोंग यांनी व्यक्त केला.

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर द्राक्ष आयातीसाठी परदेशातील खरेदीदार नाशिकमधील द्राक्षबागांची पाहणी करत आहेत. चीनचे खरेदीदार यांनी साकोरे मिग (ता. निफाड) येथील विलास बोरस्ते यांच्या द्राक्षबागेची पाहणी केली. नाना पर्पल वाणाचे काळ्या रंगाचे निर्यातक्षम द्राक्ष बघून यू चिंयोग हे प्रभावीत झाले. गतवर्षी भारतातून 30 कंटेनर चीनच्या बाजारपेठेत गेले होते. ती द्राक्ष तेथे पसंतीला उतरली असून, त्यात यंदा वाढ होऊन 200 कंटेनरपर्यंत निर्यात होऊ शकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, द्राक्षांच्या दराची सध्या वाताहत सुरू असून, चीनमध्ये निर्यातीसाठी नवी बाजारपेठ मिळाल्याने उत्पादकांना याचा फायदा होईल, असे द्राक्ष निर्यातदार सुनील शिंदे यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Global Market Indian Grapes