VIDEO : आदिमाया सप्तश्रृंगीच्या दरबारी उजळले दिवे..!पाहा

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

मंगळवारी (ता.१३) सुमारे पन्नास हजारावर भाविक आदिमाये चरणी नतमस्तक झाले. गुरुनानक जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने तसेच त्रिपूरारी पौर्णिमा अर्थात कार्तिक पौर्णिमा व मंगळवार हा देवीचा वार असे त्रिवेणी योग होता.मातेच्या दरबारात दीपोत्सव साजरा करण्यात असल्याने सकाळपासूनच भाविकांची सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी झाली होती. 

नाशिक :  त्रिपूरारी पौर्णिमा पौर्णिमा अर्थात देव दिवाळी निमित्त आदिमाया श्री सप्तशृंगी मातेच्या दरबारात दीपोत्सव साजरा करण्यात आला असून मंगळवारी (ता.१३) सुमारे पन्नास हजारावर भाविक आदिमाये चरणी नतमस्तक झाले. गुरुनानक जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने तसेच त्रिपूरारी पौर्णिमा अर्थात कार्तिक पौर्णिमा व मंगळवार हा देवीचा वार असे त्रीवेणी योग आल्याने  सकाळ पासूनच भाविकांची सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी झाली होती. 

मातेला अलंकार चढवून हिरवा शालु नेसविण्यात आला

मंगळवारी सकाळी आदिमायेच्या अलंकाराची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली होती. सकाळी देवीची पंचामृत महापूजा आरतीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. देवीस आज सोन्याचे मुकुट, मंगळसुत्र, कंबर पट्टा, नथ, कर्णपुले, कुयरी हार, पुतळे, पाऊले, तोटे आदी अलंकार चढवून हिरवा शालु नेसविण्यात आला होता.

Image may contain: indoor

भाविकांनी यज्ञकुंडात प्रज्वलीत केल्या लाखो वाती 

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी  यज्ञकुंडात लाखो वाती प्रज्वलीत केल्या. दरम्यान आज दिवसभर भाविकांची गर्दी असल्याने गडावर यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. दरम्यान सायंकाळी भाविक,  ट्रस्टचे कर्मचारी, ग्रामस्थ यांनी पहिली पायरीवरील गणेश मंदीर परीसरात फुल  व रांगोळीची आकर्षक आरास,  सजावट करुन मंदीर पायऱ्यांवर हजारो दीप प्रज्वलीत करुन दीपोत्सव साजरा केला. यावेळी असलेले नयनरम्य दृश्य बघण्यासाठी भाविक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
Image may contain: one or more people and indoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The glowing lights of the Saptshringi Vani Nashik