नाशिक - तळवाडे दिगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार

रोशन भामरे
शुक्रवार, 23 मार्च 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगरसह परिसरात काही खेड्यामध्ये डोंगरालगत राहणाऱ्या वस्त्यांवर नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. काल गुरुवारी (ता. २२) रोजी मध्यरात्री पाडगण शिवारातील वसंत रघुनाथ आहिरे यांच्या गोठ्यावर या बिबट्याने हल्ला करून शेळीला ठार केल्याची घटना घडली. गेल्या आठ दिवसातील बिबट्याच्या हल्ल्याची ही तिसरी घटना असून परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून नरभक्षक बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून तळवाडे दिगर परिसरात  शिवारालगतच्या जंगलांमध्ये असंख्य बिबट्यांनी घनदाट झाडीमध्ये सुरक्षित निवासासाठी जागा निवडली आहे. 

सायंकाळच्या वेळेस अन्न व पाण्याच्या शोधात बिबटे डोंगरालगतच्या वस्त्यांवर येत असून कुठल्या न कुठल्या शिवारात बिबट्याची वार्ता येत असते. भर दिवसा प्रत्यक्षात बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.           

गेल्या गुरुवारी (ता. १५) भवाडे रोड शिवारातील काशिनाथ आहिरे यांच्या गोठ्यावर हल्ला करून शेळी ठार केली होती. तर त्यांच्या शेजारीलच मुरलीधर आहिरे यांचे वासरूला जखमी केले होते. त्या दिवसापासून तळवाडे दिगरच्या कोणत्या न कोणत्या शिवारात रोज सायंकाळ झाली की, बिबट्याचे दर्शन होत आहे. काल गुरुवारी (ता.२२) मध्यरात्री तळवाडे दिगर येथील पाडगण शिवारातील वसंत रघुनाथ आहिरे यांच्या गोठ्यावर हल्ला करून शेळी ठार केली व घरातील व्यक्तींच्या सतर्कतेमुळे बिबट्याला मात्र शिकार अर्धवट खालेल्या अवस्थेत टाकून पळ काढावा लागला. मात्र  शिकार उपाशी पोटी सोडून जावी लागल्याने त्याने गुरगुरत डरकाळ्या फोडत संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्याचा हा थरार पाहण्यासाठी शिवारातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. शेवटी नागरिकाच्या आरडा ओरडा मुळे व बॅटऱ्याच्या तीव्र प्रकाशझोतामुळे संतप्त बिबट्याने नमते घेत दाट झाडीत पळ घेतला.

त्यावेळी सदर शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविले असता वन परिमंडळ अधिकारी केळझर प्रदीप व्यवहारे ,वनरक्षक हरी आहिरे यानी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला असून बिबट्यास तत्काळ जेलबंद करावे अशी मागणी, हेमंत पवार, देविदास आहिरे, जगन्नाथ आहिरे, देविदास ठाकरे, रमेश पवार, रमेश आहिरे, कडू ठाकरे, तुळशीराम पवार, नानाजी आहिरे, साहेबराव आहिरे, प्रभाकर ठाकरे, जयप्रकाश अहिरे आदींनी केली आहे.
 
Web Title: goat injured in leopard attack in nashik