गोदावरी आटल्याने 'त्यांना' मिळाला रोजगार!

सोमनाथ कोकरे
सोमवार, 20 जून 2016

नाशिक - गेल्या तीस वर्षांत गोदावरी नदीतील पाण्याची पातळी सर्वांत कमी झाल्याने नदीच्या पाण्यात सोने आणि इतर वस्तू शोधणाऱ्या झारेकऱ्यांना व्यवसायाचे साधन उपलब्ध झाले आहे. या व्यवसायातून त्यांना दररोज 400 ते 500 रुपयांचा उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे दुपारपासून संध्याकाळपर्यंत नदीत झारेकऱ्यांची गर्दी दिसत आहे.

गोदावरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्यात उतरून "सोनझारी झरेका‘ समुदायाला रोजगार मिळाला आहे. शहरातील घारपुरे घाटाजवळील अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक हनुमान घाटावर गेले आठ-दहा दिवसांपासून गर्दी वाढली आहे. गेल्या तीस वर्षापासून एवढी पाणी पातळी खाली गेली नव्हती. मात्र याचा "सोनझारी-झरेका‘ यांना फायदा होत आहे. झारेकऱ्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना ही संधीच उपलब्ध झाली आहे. हे लोक दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी सातपर्यंत पाण्यात डुबकी मारून लाकडी घमेल्यातून वाळू व गाळ बाहेर काढतात. मग नदीतच पाण्यात उभे राहून घमेल्यात चांदी-सोने, मणी, नाणी व मौल्यवान वस्तूंचा ते शोध घेतात. नदीतील गाळात घाटांवर चांदी-सोने, नाणे, जोडवी, दागिने याशिवाय अनेक लहान-मोठ्या वस्तू सापडतात. त्या विकून यांना चांगले पैसे मिळतात. याशिवाय गाळामध्ये ब्रिटिश कालीन नाणीही सापडतात. अशा नाण्यांनाही चांगलाच भाव मिळतो. या वस्तू विकून दररोज 400 ते 500 रुपयांचे उत्पन्न सुरू झाले आहे. 

Web Title: godavari river gets job

फोटो गॅलरी