जळगावच्या वैभवात भर घालणार ‘गोल्डन पिकॉक हॉल’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 फेब्रुवारी 2019

जळगाव - दहा हजार चौरस फुटांची भव्यता... आकर्षक फ्लोरिंग... नयनरम्य रंगसंगती अन्‌ मनमोहक झुंबर... मुंबई- पुण्यातील सभागृहांना लाजवेल असे दिमाखदार रूप... कोल्हे हिल्सवरील निसर्गरम्य परिसरात इतर आवश्‍यक सोयी-सुविधांसह सज्ज झालाय ‘गोल्डन पिकॉक हॉल’. भव्य सोहळ्यांसाठी तयार झालेला हा ‘शाही दरबार’ जळगावच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे.

जळगाव - दहा हजार चौरस फुटांची भव्यता... आकर्षक फ्लोरिंग... नयनरम्य रंगसंगती अन्‌ मनमोहक झुंबर... मुंबई- पुण्यातील सभागृहांना लाजवेल असे दिमाखदार रूप... कोल्हे हिल्सवरील निसर्गरम्य परिसरात इतर आवश्‍यक सोयी-सुविधांसह सज्ज झालाय ‘गोल्डन पिकॉक हॉल’. भव्य सोहळ्यांसाठी तयार झालेला हा ‘शाही दरबार’ जळगावच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे.

आर्किटेक्‍ट दिलीप कोल्हे यांच्या संकल्पनेतून पंधरा वर्षांपूर्वी सावखेडा शिवारात कोल्हे हिल्स परिसर विकसित झाला. ४५ एकरच्या जागेत ‘लॅव्हीश’ बंगल्यांसह एका वेगळ्या प्रकल्पावर श्री. कोल्हे यांनी काम सुरू केले. मध्यंतरी आर्थिक अडचणींमुळे या प्रकल्पाचे काम थंडावले. मात्र, आता नव्याने हे काम सुरू झाले आहे. 

रिक्रिएशन हॉल सज्ज
कोल्हे हिल्सवरील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील रिक्रिएशन हॉल सज्ज झाला आहे. दोन वर्षांपासून या सभागृहाचे काम सुरू होते. ते आता पूर्ण झाले आहे. जळगावकरांची गरज म्हणून हे सभागृह उभारले असून, मुंबई- पुण्यातही अशा प्रकारचे भव्य व देखणे सभागृह बहुधा नसावे.

असा आहे ‘गोल्डन पिकॉक हॉल’
१० हजार चौरस फुटांचे सभागृह. कुंकू- हळद- शेंदूर अन्‌ चंदन अशा नयनरम्य रंगसंगतीत भिंती... आकर्षक फ्लोरिंग... खास चीनहून मागविलेले डोळ्यांचे पारणे फेडणारे मनमोहक झुंबर... डायकीन कंपनीने इन्स्टॉल करून दिलेली १८२ टन वातानुकूलित यंत्रणा... हॉलमध्येच दोन बाजूंना भोजनाच्या स्टॉल्ससाठी खास सुविधा... सभागृहाला लागून ‘व्हीआयपीं’साठी डायनिंग व्यवस्था.... सभागृहाला लागून तरणतलाव... बाजूलाच मोठे व लहान असे दोन लॉन्स...

असे आहेत प्रस्तावित प्रकल्प
या हॉलसोबत उत्तम दर्जाचा जलतरण तलावही सज्ज आहे. सोबतच टेबल टेनिस कोर्ट, बाजूलाच पाच हजार चौरस फुटांचा दुसरा हॉल, त्यासाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह, दोन लॉन्स व त्यासाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह. एकाचवेळी दोनशेवर लोक राहू शकतील, अशी व्यवस्था. भव्य क्‍लब हाउस, त्यात कॅरम, कार्ड, चेस खेळण्याची सुविधा. रेस्टॉरंट, लॉन्ज आदी व्यवस्थाही असतील. क्‍लबला लागून टेनिस कोर्ट, भव्य पार्किंग, मुलांना खेळण्यासाठीही सुविधा असेल. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात ही कामे पूर्ण होतील.

व्यावसायिक म्हणून बांधकाम हा व्यवसाय आहे. पण, आर्किटेक्‍ट म्हणून सर्वसामान्य नागरिकांची जीवनशैली बदलण्याचे, त्याचे जीवनमान उंचावण्याचे माझे स्वप्न आहे. जळगावकरांसाठी मी तसा प्रयत्न करतोय.
- दिलीप कोल्हे, आर्किटेक्‍ट

Web Title: Golden Peacock hall in jalgav