शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमुळेच दंगली भडकल्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

नाशिक - गेल्या आठवड्यात बालिकेवरील अत्याचारानंतर ग्रामीण भागात उसळलेल्या दंगलीमध्ये शहरातील काही गुन्हेगारी टोळ्यांचा थेट सहभाग असल्याचे तपासात उघड झाल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. सराईत गुन्हेगार अर्जुन पगारेचा सहभाग यापूर्वीच समोर आला असून, आता "पीएल‘ ग्रुपचे सदस्यही दंगलीमध्ये सहभागी होण्याची शक्‍यता पोलिस सूत्रांनी वर्तविली. त्र्यंबकेश्‍वरचा शांताराम बागूल याचाही पोलिस शोध घेत आहेत. 

तळेगाव-अंजनेरीतील घटनेनंतर रविवारी सकाळी तळेगाव फाटा येथून हिंसक वळण लागले. त्यानंतर ते लोण विल्होळी, वाडीवऱ्हे, गोंदे, घोटी, सांजेगाव, नांदूरवैद्य, शेवगेदारणा, जातेगाव, तर शहरात सातपूर, नाशिक रोड, जेल रोड या भागात पसरले. यामध्ये खासगी मोटारसायकलींसह सरकारी पोलिस गाड्या व एसटी बसगाड्यांची जाळपोळ करण्यात आली. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी धम्म प्रवर्तन रॅलीमध्ये सहभागी झालेल्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या टोळक्‍याने सायंकाळच्या सुमारास ठिकठिकाणी पुन्हा हिंसक वातावरण निर्माण केले. 

पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत शहरातील नाशिक रोड परिसरात दगडफेक केल्याप्रकरणी नगरसेवक पवन पवार व त्याच्या साथीदारांना बेदम चोप देत अटक केली, तर त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील तळेगाव-अंजनेरी गावांमध्ये दहशत माजविण्यासाठी गेलेले कथित गुन्हेगार अर्जुन पगारे, शांताराम बागूल यांच्यासह सुमारे शंभर जणांच्या टोळक्‍याला ग्रामस्थांनीच बेदम चोप दिल्याची घटना घडली. 

पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून, त्या दंगलीमागे नाशिकमधील गुन्हेगारी टोळक्‍यांचा धुडघूस असल्याचे पुढे आले. यातील अर्जुन पगारे व शांताराम बागूल हे फरारी झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या दोघांसह आणखीही काही गुन्हेगारांच्या मागावर पोलिस आहेत. 

पीएल ग्रुप पोलिसांच्या रडारवर 
पोलिसांनी तपासानुसार सातपूरमधील प्रकाश लोंढे ग्रुपच्या सदस्यांचाही या दंगलीमध्ये प्रत्यक्ष सहभागाची शक्‍यता वर्तविली. नगरसेवक प्रकाश लोंढे दंगल प्रकरणात कुठेही समोर आले नाहीत, तसेच ग्रुपचा म्होरक्‍या भूषण लोंढे सध्या खुनाच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र त्यांच्या टोळीतील सदस्यांनी दंगलीला फूस लावल्याची शक्‍यता असून, त्याचा शोध आता ग्रामीण पोलिस घेत आहेत. त्याचप्रमाणे सातपूरमध्ये उद्‌भवलेल्या तणावामध्येही या ग्रुपच्या सदस्यांचा सहभाग शहर पोलिस तपासून पाहत आहेत.

Web Title: goons incited Nashik Riots, says City Police