नांदगांव बाजार समितीच्या उपसभापतीपदी गोरख सरोदे यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नांदगांव  - नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पदी जळगांव खुर्द येथील गोरख फकिरराव सरोदे यांची बिनविरोध निवड झाली.

बाजार समितीचे उपसभापती पुंजाराम जाधव यांनी रोटेशन नुसार राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या कार्यालयात आज रोजी उपसभापती पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती पदासाठी गोरख सरोदे यांचा एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक एस.पी. कांदळकर यांनी जाहिर केेले. नामनिर्देशन पत्रावर संचालक एकनाथ सदगीर व संचालक राजेंद्र देशमुख यांनी सुचक म्हणून सही केली.

उपसभापती निवडीपूर्वी संचालक मंडळाची शिवसेना कार्यालयात बैठक होवून संस्थेचे मार्गदर्शक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास कांदे व जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांचे उपस्थितीत गोरख सरोदे यांचे नावावर एकमत झाले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूकी वेळी बाजार समितीचे सभापती तेज कवडे, मावळते उपसभापती पुंजाराम जाधव, संचालक विलास आहेर, भरत शेलार, दत्तात्रय निकम, दिलीप पगार, हनुमान सानप,  भाऊसाहेब हिरे, रामचंद्र चव्हाण, श्रावण काळे, भास्कर कासार, प्रफ्फुल पारख, भाऊसाहेब सदगीर,यज्ञेश कलंत्री, यशोदाबाई हेंबाडे, अलकाताई कवडे, सरला दिवटे, मनिषाताई काटकर मंगला काकळीज, सचिव अमोल खैरनार यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख  किरण देवरे, मजूर फेडरेशन चे संचालक प्रमोद भाबड, राजाभाऊ जगताप, साहेबराव सरोदे, दत्तात्रय सरोदे, विकास टिळेकर, सुभाष सरोदे, सुर्यभान सरोदे, ज्ञानेश्वर सरोदे, बाळासाहेब सरोदे, समाधान सुर्यवंशी, नंदू गोंडळकर, अनिल सोनवणे, रवि गोंडळकर, सुनिल सरोदे, भागीनाथ सरोदे, बापूराव सरोदे, प्रमोद सरोदे, वाल्मिक हेंबाडे, भिमराज काटकर,  आदिंसह शेतकरी बांधव, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोरख सरोदे यांच्या निवडीचे शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: gorakh sarode elected as a Deputy Chairman