PHOTOS : दुर्गम-माळरानावर असूनही 'ही' शाळा बनली आधुनिकतेची खाण

विजय पगारे : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

"केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहीजे,काम करीत जा आणि हाक मारीत जा" या उक्तीचा तंतोतंत वापर सिन्नर शहरापासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सिन्नर तालुक्याच्याच नव्हे तर नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर दुर्गम व माळरानात असणाऱ्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरेवाडी शाळेने समाज सहभागाची कास धरीत गेल्या काही वर्षापासून पटसंख्या अभावी बंद पडण्याच्या छायेत असणारी शाळेने रुप पालटले असुन दुर्गम भागातील गोरेवाडी शाळा सिन्नर तालुक्यातील पहिली टॅबलेटयुक्त शाळा ठरली असुन प्रयोगशील शिक्षक उमेश खेडकर यांच्या प्रयत्नातुन आज माळरानावर आधुनिकतेचे धडे देत आहे.

इगतपुरी : सिन्नर शहरापासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सिन्नर तालुक्याच्याच नव्हे तर नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर दुर्गम व माळरानात असणाऱ्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरेवाडी शाळेने समाज सहभागाची कास धरीत गेल्या काही वर्षापासून पटसंख्या अभावी बंद पडण्याच्या छायेत असणारी शाळेने रुप पालटले असुन दुर्गम भागातील गोरेवाडी शाळा सिन्नर तालुक्यातील पहिली टॅबलेटयुक्त शाळा ठरली असुन प्रयोगशील शिक्षक उमेश खेडकर यांच्या प्रयत्नातुन आज माळरानावर आधुनिकतेचे धडे देत आहे 

शिक्षक उमेश खेडकर यांच्या प्रयत्नातुन माळरानावर आधुनिकतेचे धडे 
गोरेवाडी शाळेची पटसंख्या अवघी आठ असल्याने शाळेवर एकच शिक्षक कार्यरत होता 2018 मध्ये शाळा बंद करण्याचा फतवा प्रशासनाकडून निघाला होता याच काळात उमेश खेडकर यांची बदली त्या शाळेवर झाली असे गटशिक्षणाधिकारी  शिवनाथ निर्मळ यांना समजल्यावर त्यांनी तात्काळ बोलवून घेत सांगितले की ,सुरेगाव शाळेचा दीर्घ अनुभव तुझ्या पाठीशी आहे व आता एक बंद शाळा तुला पुनर्जीवित करण्याची संधी चालून आली आहे संकटा  शिवाय मिळणारे यश हे विजय ठरतो व संकटाशी सामना करून मिळवलेला विजय हा इतिहास घडवतो आणि तुला तो इतिहास घडवायची संधी पुन्हा प्राप्त झाली आहे व मला विश्वास आहे की, तू तिथे गेल्यावर नक्कीच बदल होईल अशी श्री.निर्मळ यांनी दिलेली प्रेरणा व त्यांची कौतुकाची थाप पाठीवर घेऊन मी गोरेवाडी शाळेत रुजू होण्यासाठी गेलो.मुख्याध्यापक प्रभाकर गुरुकुले यांच्या मदतीने शाळेत बदल करण्याची शपथ घेतली व येथुनच चांगल्या कार्यास सुरुवात झाली

Image may contain: 6 people, people smiling, people standing

समाजसहभागाची साधली संधी 
शाळा सुरु होऊन अवघे दोन महिने झाले होते गोरेवाडी येथील ग्रामदैवत ऋषी बाबा या देवाची श्रावण महिन्यातील दुस-या सोमवारी यात्रा असल्याने वर्गणी गोळा करण्याचे काम वाडीत सरू होते.यात्रेत बैलगाडी शर्यत ,संध्याकाळी मनोरंजनासाठी तमाशा असे परंतु शाळा विकासाकडे ग्रामस्थांचे दुर्लक्ष होते ही गोष्ट लक्षात आल्यावर यात्रा कमेटीच्या बैठकीच्या दिवशी दोघे शिक्षक व निर्मळ साहेब उपस्थित राहून ग्रामस्थांचे मनपरिवर्तन केले तीन तासासाठी मनोरंजनासाठी व बैलगाडी शर्यतीसाठी हौस मजेसाठी जवळपास पन्नास हजार खर्च करण्यापेक्षा तोच खर्च जर आपण आपल्या मुलांसाठी ,नातवांसाठी खर्च केले तर ती दीर्घकाळ मुलाना ज्ञान मिळविण्यासाठी उपयोगात कसे येतील हे त्यांच्या मनी रुजवण्यात आम्हीं पूर्ण पणे यशस्वी झालो व त्या वर्षी होणारा सर्व खर्चातून शाळेची रंगरंगोटी करून शाळा डिजिटल करण्यात आली.बंद पडणा-या शाळेचा पट सप्टेंबर अखेर तीन पटीने वाढला व शाळेच्या निर्जीव भिंती सजीव होऊन ह्या रानमाळावरील चिमुकल्या रानपाखारांचा किलबिलाट अतिशय उत्साहाने शाळेच्या आवारात आनंदाने ऐकू येऊ लागला . 

Image may contain: 2 people, people sitting

गोरेवाडी शाळा सिन्नर तालुक्यातील पहिली टॅबलेटयुक्त शाळा
 समाज परिवर्तनाची व विकासाची पर्वणी अशीच चालू ठेवून विद्यार्थी गुणवत्तेसाठी दुसरे पाउल सप्टेबर अखेर टाकले ते म्हणजे वाडीतील पहिले शिक्षक गोरे गुरुजी यांचे बारावे पुण्यस्मरण धुमधडाक्यात करण्याचे त्यांच्या मुलांनी ठरवले होते हे समजल्यावर आम्ही त्यांची भेट घेऊन तुमच्या कुटुंबाचा समाजामध्ये कायम स्वरूपी आदर्श कसा राहील याची जाणीव करून दिली व या जगात असून ही जगाशी संपर्क नसलेल्या या माणसांचा व मुलांचा विचार करून त्यांची तंत्रज्ञानाशी नाळ जुळवण्यासाठी गोरे कुटुंबाकडून प्रती दोन विद्यार्थ्या मागे एक tablet घेऊन गोरे कुटुंबाच्या दातृत्वातून दुर्लक्षित शाळा सिन्नर तालुक्यातील पहिली tablet युक्त शाळा बनली या नाविन्यपूर्ण उपक्रमातून माळाराना वरील मुले शाळेत बसून जगाची सफर करू लागली. 

 

Image may contain: 3 people

शाळा बनली आधुनिक उपक्रमांची खाण 

या सर्व घडामोडीनंतर आता शाळेचे दुसरे पर्व सुरु झाले आहे सध्या शाळेत "साद माणुसकीची ”हा उपक्रम सुरु केला.या उपक्रमाअंतर्गत होतकरू सामाजिक कार्य करणारे व वाडीशी संबधित असणारे या सर्व लोकांची एकत्रत मोट बांधत सोशल मिडीयावर एक समूह तयार करण्यात आला व विद्यार्थ्यांच्या समस्या व अडचणी या चर्चा करण्यात आली.या समस्याला साद घालत  सेवानिवृत्त शिक्षक अशोक गोरे यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व मुलांना दप्तर ,सर्व इयेत्ते नुसार वह्या व इतर शालेपयोगी  वर्षभर पुरेल एवढे साहित्य वाटप केले व दर वर्षी देण्याचे कबूल करून त्यांनी ही समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला. या बरोबरच शाळेत अनेक सहशालेय उपक्रम राबविले जातात त्यात वेध अंतराळाचा हा एक उपक्रम राबवला आहे तसेच शालेय उपयुक्त साहित्य त्यामध्ये साऊंड सिस्टम ,शालेय परिसरात शोभेची झाडे ,विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कार्पेट अनेक गोष्टींचा विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी उपयोग झाला आहे. या सर्व कामात मुख्याध्यापिका सुनिता सोनवणे यांचे मोलाची साथ लाभत आहे  

प्रतिक्रिया 
गोरेवाडीची शाळा खरोखरच दुर्गम भागातील असून,उपक्रमशील शिक्षक उमेश खेडकर यांनी तालुक्यातील पहिली टॅबलेटयुक्त शाळा करून हा स्तुत्य उपक्रम सुरु केला.आपली समाजाबरोबर असेलेली बांधिलकीचे सुंदर उदाहरण इतरांना नक्कीच प्रेरक ठरेल व पुढील कार्यास त्यांना हार्दिक शुभेच्छा. - शिवनाथ निर्मळ ,गटशिक्षणाधिकारी
, पंचायत समिती ,सिन्नर 

दुर्गम भागात व माळरानावर काम करत असताना आपल्या पाठीशी प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व ठामपणे उभे राहिल्यास हाती घेतलेले काम नक्कीच पूर्णत्वाकडे जाते व त्याचे मिळवलेले फलित विद्यार्थी गुणवत्तेसाठी व सामाजिक हित जोपसण्यात नक्कीच उपयोगी पडते - उमेश खेडकर उपक्रमशील शिक्षक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gorewadi school has become a modern mine