गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठीच्या योजनेस शासनाची मान्यता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

सटाणा : बागलाण तालुक्यातून गुजरात राज्यात वाहत जाऊन पुढे पश्चिम वाहिनीद्वारे अरबी समुद्रास मिळणारे पावसाचे पाणी अडवून ते तापी तुटीच्या खोऱ्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पात वळविण्यासाठी नियोजित वाघंबा शेरमाळ डोंगर वळण योजनेसाठी शासनाने ५ कोटी ३५ लक्ष रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशी माहिती बागलाणच्या आमदार सौ.दीपिका चव्हाण यांनी आह येथे दिली.

सटाणा : बागलाण तालुक्यातून गुजरात राज्यात वाहत जाऊन पुढे पश्चिम वाहिनीद्वारे अरबी समुद्रास मिळणारे पावसाचे पाणी अडवून ते तापी तुटीच्या खोऱ्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पात वळविण्यासाठी नियोजित वाघंबा शेरमाळ डोंगर वळण योजनेसाठी शासनाने ५ कोटी ३५ लक्ष रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशी माहिती बागलाणच्या आमदार सौ.दीपिका चव्हाण यांनी आह येथे दिली.

याबाबत बोलताना आमदार चव्हाण म्हणाल्या, बागलाण तालुक्यातील पश्चिमेकडील डोंगर रांगांतून पावसाचे पाणी गुजरातकडे वाहून जाते. या पाण्याचा वापर बागलाणवासियांना होण्यासाठी शासनदरबारी सातत्याने प्रयत्न सुरु होते. या नियोजित वळण योजना वाघंबा शेरमाळ डोंगरचे पाणलोट क्षेत्र ०.५२ चौरस किलोमीटर इतके असून याद्वारे होणारी जलनिष्पत्ती १६.७८ दशलक्ष घनफूट इतके असून पूर्ववाहिनी तापी खोऱ्यात वळविणे प्रस्तावित आहे. या योजनेचा सखोल अभ्यास करून सर्व्हेक्षणही पूर्ण झाले आहे. या योजनेमुळे पश्चिम वाहिनीकडे वाहणाऱ्या पाण्याचा येवा ८.०७ दशलक्ष घनफूट इतका आहे. हा येवा पूर्व वाहिनीकडे वळविण्यासाठी ३० मीटर लांबीची भिंत व १९६ मीटर लांबीचा वळण कालवा पश्चिम वाहिनीकडे सोडणे प्रस्तावित आहे.

त्याबरोबरच वाघंबा गावतळे क्रमांक ३ च्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या नाल्यातही हे पाणी सोडण्याचे प्रस्तावित आहे. साल्हेर वळण योजना क्रमांक २ च्या पूर्व वाहिन्कडे वळविण्यासाठी नाला क्रमांक २ वर २५ मीटर लांबीची भिंत व ९५ मीटर लांबीचा वळण कालवा क्रमांक २ मधून वाघंबा गावतळे पाणलोट क्षेत्रातील नाल्यात सोडले जाणार आहे. या सांडव्याची लांबी ३०.१० मीटर इतकी आहे. 

या योजनेच्या माध्यमातून साल्हेर वळण योजना क्रमांक १ मधून ८.०७ दशलक्ष घनफूट, योजना क्रमांक २ मधून १६.७८ व वाघंबा योजनेतून पुन्हा १६.७८ दशलक्ष घनफूट असे रएकत्रित पाणी उपलब्ध होणार आहे. हे सर्व पाणी हरणबारी धरणात सोडण्यात येईल. त्यामुळे हरणबारी लाभक्षेत्रातील गावे व मोसम खोऱ्याला या पाण्याचा मोठा लाभ होणार आहे. परिसरातील सिंचन व बिगर सिंचन क्षेत्रास मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचा दावाही आमदार सौ.चव्हाण यांनी केल आहे. 
मोसम खोऱ्यातील सिंचनासह पिण्याच्या पाणीप्रश्नासाठी हरणबारी उजव्या कालव्यातून वाढीव कालवा पारनेर - सातमाने पर्यंतच्या गावांना पाणी पोहोचविण्याचा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा सुरु असून लवकरच त्यास मंजुरी मिळेल असा विश्वास आमदार सौ.चव्हाण यांनी व्यक्त केला. 

Web Title: Government approval for the implementation of water from Gujarat