सटाणा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास शासनाची मान्यता

रोशन खैरनार
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सटाणा - सटाणा नगरपालिकेच्या बहुउद्देशीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आज येथे दिली.

सटाणा - सटाणा नगरपालिकेच्या बहुउद्देशीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आज येथे दिली.

याबाबत बोलताना श्री. मोरे म्हणाले, शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्यावर आजपर्यंत कोणतीही प्रक्रिया केली जात नव्हती. पालिकेवर शहरविकास आघाडीची सत्ता येताच शहरातील जमा होणारा ओला व सुका कचरा यांचे विलगीकरण होऊन यापासून सेंद्रिय खत निर्मिती व वीज निर्मिती प्रकल्पास मंजुरी दिली होती. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम इंदौर येथील निरी या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने ऑक्टोबर २०१७ मध्ये प्रकल्प अहवाल तयार केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्यास मान्यता दिली. त्यानुसार पालिका हद्दीतील चौगाव बर्डी येथील २० ते २५ हजार टन कचरा रिक्लीन करणारा प्रकल्प उभारला जाणार आहे. 

यासाठी लागणाऱ्या जागेबरोबरच सदर प्रकल्पाच्या जागेला संरक्षण भिंत, खत, वीज निर्मिती साठी लागणारी यंत्र सामुग्री, शेड, कामगारांसाठी घरे, वीजपुरवठा, अंतर्गत रस्ते यांचा यात समावेश आहे. सदर प्रकल्पाची किंमत ३ कोटी ९३ लाख ७६ हजार असून, केंद्र शासनातर्फे १ कोटी ३७ लाख ८१ हजार, राज्य शासनाकडून ९१ लाख ८७ हजार व १४ व्या वित्त आयोगातून १ कोटी ६४ लाख रुपये रुपये अशा पद्धतीने एकूण ३ कोटी ९३ लाख रुपयांचा प्रकल्प शासनाने मंजूर केला आहे. 

या प्रकल्पामुळे जमा होणाऱ्या कचऱ्यावररोजच्या रोज प्रक्रिया होणार आहे. याकामी पालिकेच्या उपनगराध्यक्षा सुवर्णा नंदाळे, शहर विकास आघाडीचे गटनेते राकेश खैरनार, भाजपा गटनेते महेश देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते काकाजी सोनवणे, काँग्रेसचे गटनेते दिनकर सोनवणे, नगरसेवक दीपक पाकळे, सुनिता मोरकर, राहुल पाटील, निर्मला भदाणे, शमा मन्सुरी, शमीम मुल्ला, सुलोचना चव्हाण, बाळू बागुल, पुष्पा सूर्यवंशी, सोनाली बैताडे, आरिफ शेख, आशा भामरे, संगीता देवरे, भारती सूर्यवंशी, सुरेखा बच्छाव, विद्या सोनवणे, मनोहर देवरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, आरोग्य निरीक्षक शालीमार कोर, बांधकाम अभियंता चेतन विसपुते आदी उपस्थित होते.

Web Title: Government approval for the solid waste management project of Satana Municipal Corporation