सरकारी बॅंक कर्मचारी २१ पासून संपावर

Bank
Bank

नाशिक - चालू आठवड्याच्या शेवटी सरकारी बॅंक कर्मचारी संपावर जाणार असल्याने पाच दिवस बॅंका बंद राहणार आहेत. त्यामुळे २१ तारखेच्या आत बॅंकेतील व्यवहार आटोपून घ्यावे लागणार आहेत. 

बॅंक ऑफ बडोदा, देना बॅंक आणि विजया बॅंक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून बॅंक कर्मचाऱ्यांकडून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. तसेच या संपावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे.

कर्मचारी २१ डिसेंबरपासून संपावर जाणार आहेत. ख्रिसमस आणि वर्षअखेरीस फिरायला जाणाऱ्यांना २१पूर्वीच पैशांची तजवीज करावी लागणार आहे. शुक्रवारी (ता. २१) संप, २२ ला चौथा शनिवारी, २३ ला रविवारची सुटी, सोमवारी (ता. २४) बॅंका उघडतील. मात्र बहुतांश कर्मचारी रजेवर दिसतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com