Nandurbar News : शासन आपल्या दारी मोहीम; ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र | Government campaign at your door Yojna Sugarcane workers will get identity card Nandurbar News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar Cane news

Nandurbar News : शासन आपल्या दारी मोहीम; ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र

Nandurbar News : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासन आपल्या दारी अभियानांतर्गत ऊसतोड कामगारांना ओळखपत्रवाटप करण्यात येणार असल्याचे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी कळविले आहे.

राज्यातील ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकारक करून त्यांचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी ऊसतोडणी व्यवसायातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ओळखपत्र प्रदान करण्यासंदर्भात नियमावली निश्चित केली आहे. (Government campaign at your door Yojna Sugarcane workers will get identity card Nandurbar News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांना आवाहन करण्यात येते, की जे ऊसतोड कामगार मागील तीन वर्षे किंवा जास्त कालावधीपासून ऊसतोडणीचे काम करीत आहेत व जे इतर नियमांची पूर्तता करीत आहेत त्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करून नोंदणी करून विहित नमुन्यात ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे,

जेणेकरून भविष्यात या कामगारांकरिता शासनाच्या येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेणे सोयीचे होईल, असे आवाहनही नांदगावकर यांनी केले आहे.