साडेसात हजारांहून अधिक खड्डे बुजविल्याचा दावा तर केला...पण प्रत्यक्षात..

potholes 111.jpg
potholes 111.jpg

नाशिक : राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नाशिकमधील रस्ते गुणवत्तापूर्ण व खड्डेमुक्त असल्याचा दावा यंदाच्या पावसाळ्यात फोल ठरल्यानंतर बांधकाम विभागाने राबविलेल्या खड्डामुक्ती अभियानातून 24 दिवसांत सात हजार 748 खड्डे बुजविल्याचा दावा केला. अद्याप 893 खड्डे बुजविणे बाकी असल्याची माहिती शहर अभियंता संजय घुगे यांनी दिली. 

अद्याप 893 बुजविण्याच्या प्रतीक्षेत 

यंदा पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची दैना उडाली होती. निवडणुकांच्या माहोलमध्ये रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत रस्तेदुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. खड्डे भरण्यासाठी 38 कोटींचा निधीदेखील मंजूर करण्यात आला. 30 नोव्हेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त करताना आठ हजार 641 पैकी सात हजार 748 खड्डे बुजविल्याचा दावा करण्यात आला. 

हेही वाचा > आई फोनवर बोलत होती..अन् बाळ रांगत गेलं बाथरुममध्ये....नंतर आई येऊन बघते तर काय.....

पंचवटी, सातपूरचे खड्डे बुजले 
सातपूर विभागात एक हजार 621 खड्डे होते. त्यातील एक हजार 540 खड्डे डांबराने व 81 खड्डे मुरमाने भरण्यात आले. पंचवटी विभागात दोन हजार 35 खड्डे होते. त्यापैकी एक हजार 757 खड्डे डांबराने, तर 278 खड्डे मुरमाने भरण्यात आले. नाशिक रोड विभागात एक हजार 87 पैकी 740 खड्डे बुजविण्यात आले. पूर्व विभागात 113 खड्डे, सिडको विभागात 324, तर पश्‍चिम विभागात 109 खड्डे भरणे शिल्लक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com