सहकारी बॅंक कर्मचारी किमान वेतनाविना

Money
Money

नाशिक - राज्यातील ५६० सहकारी बॅंकांमधील साठ हजार कर्मचाऱ्यांपैकी चाळीस हजार कर्मचाऱ्यांना किमान वेतनही मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे महिन्याला पाच ते पंधरा हजार रुपयांवर त्यांना राबावे लागते. वेतन कराराचे दीडशे दावे वर्षानुवर्षे सहकारी बॅंक वेतन मंडळाकडे प्रलंबित आहेत.

सहकारी बॅंकांमधील कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले पाहिजे, असा कामगार कायदा आहे. मात्र त्याचे पालन झाले पाहिजे, यावर प्रभावी नियंत्रण नाही. वेतन कराराच्या वादात सहकारी बॅंक वेतन मंडळ हस्तक्षेप करुन निकाल देऊ शकते. पण गेल्या काही वर्षांत हे मंडळ अस्तित्वात आहे काय? अशी स्थिती होती. आता या मंडळाची फेररचना झाली आहे.

बऱ्याच सहकारी बॅंका तोट्यात असल्याने त्या किमान वेतनही देऊ शकत नाहीत. अशावेळी सहकारी बॅंकांची कर्मचाऱ्यांनी सरकारकडे न्याय-हक्कासाठी दाद मागावी लागते. त्यांचे प्रकरण वेतन मंडळाकडे येते आणि पुढील कार्यवाही होते.
- विजय मोगल, सदस्य, सहकारी बॅंक वेतन मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com