शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यास सरकार सकारात्मक : दराडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

येवला : राज्यातील सुमारे तीस हजार विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुमारे 275 कोटींची तरतूद केली जाईल. तसेच उच्च माध्यमिक शाळांच्या याद्या आयुक्त कार्यालयातून मागवून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आला, अशी माहिती विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिली.

मागील आठवड्यात विधान परिषदेत शिक्षक आमदारांच्या निवेदनावर उत्तर देताना शिक्षणमंत्री तावडे यांनी शाळांना अनुदान देण्यासंदर्भात शिक्षण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज फडणवीस, तावडे व शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

राज्यातील सुमारे अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या आणि कार्योत्तर मान्यता अट शिथिल केल्यास पात्र होणाऱ्या उच्च माध्यमिक शाळा १२७९ व तुकड्या १८६७ आणि यावरील सुमारे दहा हजार शिक्षकांना तसेच २० टक्के अनुदान प्राप्त शाळा व तुकड्यांना पुढील वीस टक्के अनुदानासाठी पात्र १६१८ शाळा व २४५२ तुकड्यांवरील सुमारे १४ हजार शिक्षक व पाच हजार शिक्षकेतर असा सुमारे २ हजार ९०७ शाळा,४ हजार ३१९ तुकड्यांवरील ३० हजार शिक्षक व पाच हजार शिक्षकेतर कर्मचाऱयांना अनुदान मिळून त्यांचा प्रश्न मार्गी लागू शकणार आहे. यासाठी सुमारे २७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून वित्त विभागाशी चर्चा करून अर्थसंकल्पात यावर तरतूद केली जाईल, असेही यावेळी ठरले.

तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांत मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्याचे आश्वासनही तावडे यांनी यावेळी दिले. या बैठकीला दराडे यांच्यासह शिक्षक आमदार उपस्थित होते. त्यांनी अनुदानाचा प्रश्न या बैठकीत लावून धरला.

“नागपूर अधिवेशनापासून आम्ही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या अनुदानाचा प्रश्न लावून धरला आहे. विधानपरिषदेत याप्रश्नी आमदारांनी जोरदार मागणी केल्याने आज तावडे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक पार पडली. आजच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाले आहेत. मात्र, हे प्रश्न मार्गी लागेपर्यंत आमचा ठोस पाठपुरावा सुरू राहील.”

- किशोर दराडे, शिक्षक आमदार,नाशिक विभाग

Web Title: Government positive to teachers grants issue says Darade