उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिकरणाचे चाके कधी फिरणार?

 industrialization
industrializationesakal

सातपूर (नाशिक) : भालेर (ता. नंदुरबार) येथे शासनाने मंजूर केलेला टेक्स्टाईल पार्कही आता धोक्यात आला आहे. वीज वितरण कंपनीच्या दिरंगाईमुळे सुरतसह मुंबई, पुणे, नाशिक येथील इच्छुक उद्योजकांनी पाठ फिरविली आहे. वेळेवर एमआयडीसी उभी राहात नसल्याने टेक्स्टाईल पार्कसह इतर येऊ घातलेली गुंतवणूक व त्यामुळे निर्माण होणारे आदिवासी तरुणांचे रोजगारचे भवितव्य अधांतरी आहे. हीच परिस्थिती उत्तर महाराष्ट्रातील पेठ, दिंडोरी, मालेगाव, भुसावळ आदी भागांची आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी गुंतवणूकदांसह आदिवासी बांधवांनी केली आहे.

दरम्यान, भालेर एमआयडीसीत अंतर्गत रस्ते, पाण्याची सोय आदी कामे करून प्लॉट पाडण्याचे काम रेंगाळले होते. त्यावर धुळे येथील प्रादेशिक अधिकारी भामरे व अधीक्षक अभियंता बाळासाहेब झंजे यांनी विशेष प्रयत्न केल्याने रस्ते, जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. एमआयडीसीने प्लॉट वाटपही केले. मात्र, वीज वितरण कंपनीतर्फे वीज उपकेंद्र उभारत नसल्याने एमआयडीसी व आदिवासी तरुणाचे भवितव्य अधांतरीच आहे. राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी भालेर एमआयडीसीमध्ये ‘वस्त्रोद्योग पार्क’ अर्थात टेक्स्टाईल झोन जाहीर केला होता.

यामुळे कापूस उत्पादकांसह बेरोजगार युवकांच्याही अपेक्षा वाढल्या होत्या. सुरत, अहमदाबाद आणि इंदूरची जवळ असलेली बाजारपेठ, कापसाची उपलब्धतेमुळे येथे हा उद्योग अधिक भरभराटीस येऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असले, तरी वीज कंपनीचे रेंगाळलेले काम त्याला आडकाठी ठरत आहे. नंदुरबार शहरापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर भालेरला प्रस्तावित एमआयडीसी साकारली जात आहे.

जवळपास चारशेपेक्षा अधिक हेक्टर जागा शासकीय आहे. त्यानंतरही जागेची आवश्यकता भासल्यास खासगी जागा अधिग्रहीत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सध्या जागा सपाटीकरण करून अंतर्गत रस्ते, पाण्याची सोय केली जात आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रकाशा बॅरेज ते एमआयडीसी, अशी १८ ते २० किलोमीटरची पाइपलाइन टाकली जात आहे. मात्र, महावितरण कंपनीकडून वीज उपकेंद्र उभारण्यासाठी कोणत्याही हालचाली नाहीत.

नवीन एमआयडीसीमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उद्योजकांना मिळणार आहेत. सद्य:स्थितीत टेक्स्टाईल उद्योगासाठी सुरत शहर प्रसिद्ध आहे. मात्र, तेथे जागेची मर्यादा आणि कुशल कामगारांच्या कमतरतेमुळे तेथील उद्योजक लगतच्या शहरांमध्ये येण्यास उत्सुक आहेत. नंदुरबार येथे सुरतसह नाशिक, पुणे, मुंबई आदी ठिकाणाच्या उद्योजकांनी उद्योगासाठी उत्सुकता दाखविली आहे.

नवापूर एमआयडीसीत ७० पेक्षा जास्त युनिट सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून सात महामार्ग जातील, अशा रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे दळणवळणाचीही समस्या राहणार नाही. अमरावती-सुरत महामार्गाला जोडणारा विसरवाडी ते सेंधवा आणि शेवाळी फाटा ते गुजरात हद्दपर्यंतचा महामार्ग नंदुरबारातून जाणार आहे. त्यामुळे गुजरात व मध्य प्रदेशात जाण्यासाठी अर्थात अहमदाबाद, सुरत, बडोदा तसेच इंदूरसारख्या बाजारपेठा कव्हर करण्यासाठी या दोन महामार्गासह बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या महामार्गाचीही मोठी मदत मिळणार आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा गरजेचा

टेक्स्टाईलबरोबर हिरे उद्योग व इतर आधुनिक टेक्नोलॉजीचा फूड प्रोसेसिंग उद्योगालाही नंदुरबार जिल्ह्यात वाव आहे. मात्र, महावितरण कंपनी खोडा घालत असल्याचे बोलले जात आहे. भालेर एमआयडीसीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

"भालेर एमआयडीसीमधील रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. पाणीपुरवठ्याचे काम प्रगतिपथावर आहे. वीज उपकेंद्रासाठी महावितरणकडे पाठपुरावा सुरू आहे."

-बाळासाहेब झंजे, अधीक्षक अभियंता, नाशिक विभाग

 industrialization
आरक्षण सोडतीवर 4 हरकती

"धुळे-नंदुरबार जिल्हातील विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी एमआयडीसी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. एमआयडीसीने प्लॉटचे वितरण केले आहे. मोठे उद्योग यावे, यासाठी मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांबरोबर सीओ डॉ. अल्बलगन विशेष लक्ष देत आहेत."

-अमित भामरे, प्रादेशिक अधिकारी

 industrialization
जाहिरात फलक अंतराबाबत लवकरच धोरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com