सरकारच्या प्रतिसादाअभावी युवासेनेचा टॅबसाठी पुढाकार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नाशिक - युवासेनेतर्फे आतापर्यंत दहा हजार शैक्षणिक टॅबचे वाटप करण्यात आले आहे. कॉपीराइट घेतलेल्या मराठी माध्यमासह इंग्रजी, सेमी इंग्रजी, गुजराथी व ऊर्दू माध्यमातील पुस्तकांचा या टॅबमध्ये समावेश आहे. टॅब हाताळता यावा, यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले आहे. सरकारला टॅब वाटपासंदर्भातील प्रस्ताव दिला होता. पण, अद्याप त्यावर निर्णय न झाल्याने युवासेनेतर्फे टॅबचे वाटप केले जात आहे, अशी माहिती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. 

मराठा हायस्कूल येथे शैक्षणिक टॅब वाटपानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की यापूर्वी मुंबईमधील 480 महापालिका शाळांना व्हर्च्युअल क्‍लासरूमच्या माध्यमातून जोडले आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना तब्बल 19 पुस्तकांपर्यंतचे ओझे दप्तरात घेऊन शाळांचे जिने चढावे लागतात. पाठ्यपुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी हा टॅब असून, त्यासोबत विद्यार्थ्यांना केवळ वह्या बाळगण्याची आवश्‍यकता आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना गेल्या वर्षी प्रस्ताव दिला होता. पण, त्यावर काही ठोस निर्णय शासनातर्फे घेण्यात आला नाही. 

युटिलिटी पेमेंट्‌ससाठीची मुदत 30 डिसेंबरपर्यंत असावी 

केंद्र सरकारतर्फे पाचशे व हजारच्या नोटा चलनातून बाद केल्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, की लोक त्रासलेले आहेत. त्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी "युटिलिटी पेमेंट्‌स'साठी या जुन्या नोटा वापराची मुदत 30 डिसेंबरपर्यंत करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: The government's lack of response to the initiative of the tab for yuvasene