Gram Panchayat Election: शहादा तालुक्यात आज ग्रामपंचायत पोटनिवडणूक; तहसील कार्यालयात उद्या मतमोजणी

Election News
Election Newsesakal

Nandurbar News : तालुक्यात विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ४१ ग्रामपंचायतींच्या ५९ सदस्यपदांसाठी गुरुवारी (ता. १८) पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्र माघारीनंतर १२ ग्रामपंचायतींच्या १३ जागांसाठी २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

गुरुवारी मतदान असल्याने मतदान कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर रवाना झाले. १९ मेस सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असल्याची माहिती येथील तहसीलदार दीपक गिरासे यांनी दिली. (Gram Panchayat Bypoll election today in Shahada taluka Counting of votes tomorrow at Tehsil office Nandurbar News)

Election News
NMC News : उजव्या कालव्यावरील अतिक्रमण हटविणार; पाणीपुरवठा विभागाकडून पत्र

तालुक्यात मृत्यू, अपात्र किंवा इतर कारणास्तव रिक्त राहिलेल्या ४९ ग्रामपंचायतींच्या ५९ जागांकरिता पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवसाअखेर ६० नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली होती.

माघारीच्या दिवशी नऊ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यात आली. १४ ग्रामपंचायतींच्या २७ जागांसाठी एकाही उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल न केल्याने त्या जागा रिक्त आहेत. उर्वरित १५ ग्रामपंचायतींच्या २४ जागांसाठी प्रत्येकी एक नामनिर्देशनपत्रदाखल करण्यात आल्याने त्या जागा बिनविरोध झाल्या आहेत.

उर्वरित १२ ग्रामपंचायतींच्या १३ जागांसाठी २७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नामनिर्देशनपत्र माघारीनंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

Election News
Crime News : धक्कादायक! 'त्या' पती-पत्नीची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

गुरुवारी या जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीसाठी घेण्यात येणाऱ्या मतदान प्रक्रियेसंदर्भात नियुक्त कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी ९० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एका ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचारी असे पाच कर्मचारी आहेत. निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचारी बुधवारी दुपारी साहित्य घेऊन निवडणुकीच्या गावी पोचले. निवडणुकीदरम्यान कोणीही कर्मचाऱ्याने कामात दिरंगाई करू नये.

मतदार व उमेदवार, कार्यकर्त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीपक गिरासे यांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Election News
Solapur News : कलावंतच जनतेचे प्रश्न मांडू शकतात प्राध्यापक सुरेश शिंदे

बारा ग्रामपंचायतींत मतदान

तालुक्यातील डामरखेडा, औरंगपूर, तऱ्हाडी, मडकानी, तलावडी, अमोदा, सुलवाडे, कुरंगी, टवळाई, चांदसैली, खेडदिगर व मलगाव या १२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. टेंभली, पाडळदा, सावखेडा, वर्डे त.श., परिवर्धा, दुधखेडा, पिंपर्डे, कोचरा, मंदाणा, जावदे त.ह, भोंगरा, लंगडी भवानी, काकर्दे-दिगर, खापरखेडा, कोंढावळ या १५ ग्रामपंचायतींच्या २४ जागा बिनविरोध झाल्या.

एकही अर्ज दाखल न झालेल्या १४ ग्रामपंचायतींमध्ये मलोणी, अलखेड, कमरावद, शोभानगर, करजई, बुपकरी, लांबोळा, कानडी त.श., पळसवाडा, कानडी त.ह., लक्कडकोट, कर्जोत, ओझरटा व वडगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Election News
Pune News : पुणे महापालिकेच्या दबंग जगतापांवर कारवाई करण्याच्या मागणीचा जोर वाढला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com