esakal | Gram panchayat election: कोणीबी निवडो गुलाल ते आमीनच उधळसूत..!
sakal

बोलून बातमी शोधा

Gram panchayat election: कोणीबी निवडो गुलाल ते आमीनच उधळसूत..!

जिल्ह्यातील सहा हजारावरील उमेदवार निकाल आपल्याच बाजूसे कसा लागेल. याबाबतीत विविध जर तरची समीकरणे मांडत आहेत.

Gram panchayat election: कोणीबी निवडो गुलाल ते आमीनच उधळसूत..!

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : महिनाभरापासून लोकशाहीचा महा महोत्सव सुरु आहे. या महोत्सवावर उद्या (ता.18) पडदा पडेल. अन पाच वर्षांच्या नव्या विकास नाट्याला सुरुवात होईल. तत्पुर्वी जिल्ह्यातील एकशे त्र्याऐंशी गावांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता शिगेला पोहचली आहे. जर तर ने आणि विजय आपलाच ही समीकरणे अशी तयार झाली आहेत, की गणित तज्ञांनाही समजणे कठिण झाले आहे. यावर एकाने मार्मिक सांगितले, भाऊ आता कश्याला घेता एवढा डोक्याला ताण, घोडा मैदान आंगेच शे ना...ते बी कालदीनच...तव लगून ठाय बस...! तर दुसरे म्हणताहेत, कोणीबी निवडो गुलाल ते आमीनच उधळसूत..!

आवश्य वाचा- कोरोनाच्या लसीकरणामुळे सर्वसामान्यांच्या मनातील भिती होणार दुर !
 

धुळे जिल्ह्यात दोनशे अठरा ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पुर्ण होण्यास अवघा दिवस आहे. पस्तीस पंचायती बिनविरोध झाल्यानंतर एकशे त्र्याऐंशी पंचायतीचे मतदान होवून सोमवारी निकाल आहे. याकडे सार्‍यांचेच लक्ष आहे.

जर तर ची समिकरणे...
जिल्ह्यातील सहा हजारावरील उमेदवार निकाल आपल्याच बाजूसे कसा लागेल. याबाबतीत विविध जर तरची समीकरणे मांडत आहेत. ही समिकरणे एवढी अचूक मांडत आहेत, की गणित तज्ञांनाही सोडविणे दूरच पण समजणेही कठीण झाली आहेत.


डिपाॅजिट जप्त होणार्‍यांनाही विजयाची आशा ?
उमेदवारी करुन उभे राहण्यांची हौस पुर्ण करणार्‍यांनाही आपणच विजयी कसे होवू, याबाबतीत त्यांनी नवा जवाईशोध लावला आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांची डिपाॅजिट कशी जप्त होईल. याबाबतीत त्यांचे संधीसाधू कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलत आहेत.

आवर्जून वाचा- शिजवलेले चिकन, उकडलेली अंडी खाणे पुर्णत: सुरक्षित; जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष सुरू 
 

गुलाल ते आमीनच उधळसूत
प्रत्येक गावात बरेचसे कार्यकर्ते अती उत्साही असतात. ते चारी कडचे पाहुणे असतात. कुणीही निवडो...त्या गोटात विजय साजरा करण्याची संधी सोडत नाहीत. तेवढ्या धुर्त चाली त्यांनी खेळलेल्या असतात. अन ते आपांपसात म्हणताहेत, कोणीबी निवडो गुलाल ते आमीनच उधळसूत.

संपादन- भूषण श्रीखंडे