Gram panchayat election : मतदानावेळी ना सॅनिटायझर, ना थर्मल गन, ना डिस्‍टन्सिंग ! 

Gram panchayat election : मतदानावेळी ना सॅनिटायझर, ना थर्मल गन, ना डिस्‍टन्सिंग ! 

सारंगखेडा : मतदान होत असलेल्या काही गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असतानाही शुक्रवारी (ता. १५) कोरोना नियमावलीचे पालन न करता मतदान सुरू होते. शहादा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७७ केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान झाले. मतदान प्रक्रियेदरम्यान कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाले. मतदान केंद्रावर प्रत्येक मतदाराचे तापमान मोजले जाणार होते. कोरोना संशयित मतदारांना शेवटी मतदानाची संधी दिली जाणार होती. मात्र याकडे प्रशासनाने गंभीरतेने लक्ष दिल्याचे दिसून आले नाही. 

तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसाठी ४४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, ७७ केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान होते. सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली. ४१ हजार ५७० मतदार असून, त्यात २१ हजार २०१ महिला, तर २० हजार ३६९ पुरुष मतदार आहेत. मतदान होत असलेल्या सारंगखेडा, बामखेडा तर्फे तऱ्हाड यासह बहुसंख्य गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने मतदान केंद्रात कोरोना नियमावली बंधनकारक करणे आवश्यक होते. मतदान प्रक्रियेदरम्यान कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मतदारांना मास्क बंधनकारक केले होते. यासह केंद्रावर सॅनिटायझर उपलब्ध होणार होते. मतदारांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन उपलब्ध होणार होती. परंतु मतदान केंद्रावर कुठल्याही नियमांचे पालन झाले नाही. 

तर कोरोनाचा होवू शकतो उद्रेक

मतदान केंद्रावर सॅनिटायझर व थर्मल गन दिलेले नसल्याचे दिसून आले. त्यातून केंद्रांवर झालेली गर्दी लक्षात घेता कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांनाही त्याचा धोका संभवतो. मतदानासाठी आलेल्या मतदारांना मास्क बंधनकारक होते. मात्र मतदान प्रक्रियेत मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक पुराव्यासह मतदारांना काही क्षण मास्क काढावा लागला. मतदाराची ओळख पटल्यानंतरच मतदान करू दिले. मतदाराच्या नाकासह तोंडाला मास्कचा नियम पाळण्यात आला.  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com