39 जागांसाठी तीन उमेदवार ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

जळगाव ः जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या. 39 जागांसाठी या मुलाखती असताना केवळ तीनच उमेदवार आले. या तिघांची नियुक्ती करण्यात आली असून पहूर, बोदवड, रावेर ग्रामीण रुग्णालयांना वैद्यकीय अधिकारी मिळण्याची चिन्हे आहेत. 

आरोग्य विभाग "सलाईन'वर 
जिल्ह्यात आरोग्य विभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त जागा आहेत. ग्रामीण रुग्णालयांसाठी 71 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदे मंजूर असताना केवळ 45 पदे भरलेली आहेत. त्यातही 13 वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने 32 वैद्यकीय अधिकारीच कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न बिकट असून आरोग्य प्रशासनालाही डॉक्‍टरांसाठी मोठी कसरत करावी लागते. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे पहूर येथे गेले असताना त्यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याचे आढळून आले होते. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याविषयी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागातर्फे रिक्त पदांची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. 
यामुळे आज अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 39 जागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मात्र यासाठी केवळ तीनच उमेदवार मुलाखतीसाठी आले. या तीनच उमेदवारांच्या मुलाखती जिल्हा निवड समितीच्यावतीने घेण्यात आल्या. यावेळी निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, समितीचे सदस्य उपस्थित होते. 
तीन उमेदवारांच्या मुलाखती झाल्यानंतर आता निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तीन- चार दिवसात तीन ग्रामीण रुग्णालयांना वैद्यकीय अधिकारी मिळेल अशी अपेक्षा आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gramin hospital medical officer 39 placement 3 candidate