सटाण्यातील महिलांना मिळाला ग्रामीण महिला उद्योजकता पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

सटाणा - येथील महिला गृहउद्योग सहकारी सोसायटीला राज्य शासनाचा ग्रामीण महिला उद्योजकता पुरस्कार मिळाला आहे. राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते संस्थेच्या अध्यक्षा मिना मधुकर घोडके व उपाध्य्क्षा रंजना प्रकाश सावकार यांना मुंबई येथे पुरस्कार देण्यात आला.

उद्योगातून महिला सबलीकरणाचा प्रसार वाढविण्याचा अनुषंगाने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने राज्यातील १२ महिला उद्योजक संस्थांची या पुरस्कारसाठी निवड केली आहे. मंत्रायलात संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमात राज्यमंत्री विशाल चोरडिया, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.रिया बागला उपस्थित होते. 

महिला गृहउद्योग ही संस्था ३८ वर्षांपूर्वी स्थापन झाली असून, माहेर ब्रँडचे मिरची, हळद, धना पावडर व मसाल्यांचे उत्पादन करीत आहे. संस्थेच्या या आदर्श कामकाजामुळे शासनाकडून सिन्नर येथील औद्योगीक वसाहीतीत १५० चौरस मीटरचा भूकंड खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. सत्काराला उत्तर देताना मिना घोडके म्हणाल्या, अत्यंत प्रतिकूल परीस्थित संस्थेने वाटचाल करीत यशाचा मोठा टप्पा गाठला आहे. यामुळे समाधानी आहे. संस्थेच्या पारदर्शी कारभारात आजी, माजी पदाधिकारी, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचा सिहांचा वाटा आहे. कार्यक्रमास संस्थेचे व्यवस्थापक सुभाष सोनार, गोकुळ शिंदे, रमेश येवला आदींसह महिला संचालिका उपस्थित होत्या.

Web Title: Gramin Woman Entrepreneurship Award for Women in satana