जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त भव्य रॅली!

भगवान जगदाळे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त गुरुवारी (ता. 9) सकाळी दहाच्या सुमारास आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहापासून दोन्ही गावांतील मुख्य मार्गांवरुन भव्य रॅली काढण्यात आली. त्यात निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील आदिवासी समाजबांधव, विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला, विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते पारंपारिक वेशभूषेत मोठया संख्येने सहभागी झाले होते. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा, वीर एकलव्य आदींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

जैताणेतील भिल्लवस्तीतही वीर एकलव्य चौकात सरपंच संजय खैरनार यांनी रॅलीचे जंगी स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, सुरेखा भिल, आबा भिल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सरपंच खैरनार यांनी आखाडेचे सरपंच श्रावण भवरे यांचा सत्कार केला. जैताणे ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरातही उपरपंच आबा भलकारे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांतर्फे आदिवासी समाज बांधवांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. संकल्प आदिवासी युवा जागृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास बागुल यांच्या हस्ते सांस्कृतिक रॅलीचे उदघाटन झाले. आखाडे येथे रॅलीचा समारोप झाला. दुपारी चारला आखाडे येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

माळमाथा परिसरातील सर्व आदिवासी भिल्ल, कोकणी, मावची, पारधी समाजबांधवांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. तर संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना, एकलव्य आदिवासी युवा संघटना, एकलव्य आदिवासी युवक संग्राम परिषद, आदिवासी कोकणी समाज संघटना, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना, वीर एकलव्य मित्र मंडळ आदी तालुका शाखांनी नियोजन केले. आखाडेच्या ग्रामस्थांसह महिला व युवा मित्र मंडळ, निजामपूरची आदिवासी मुला-मुलींची दोन्ही शासकीय वसतिगृहे, शिव एकलव्य बँड (वासखेडी) व वीर एकलव्य बँड (रुणमळी) आदींनी विशेष सहकार्य केले.

Web Title: A grand rally on the occasion of World Tribal day at nijampur jaitane