ऊन्हाच्या तडाख्याने द्राक्षवेलींच्या विकासावर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

निफाड (नाशिक) : तालुक्याची द्राक्षपंढरी असलेल्या पिंपळगांव ब सुकेणे उगांव, वनसगांव शिवडी, खडकमाळेगांव, सारोळे, सावरगांव, रानवड, सोनेवाडी परिसरात द्राक्षबागांच्या खरड छाटण्यांनी जोर धरला आहे. मात्र वाढत्या तपमानामुळे नविन फुटव्याला विलंब होत आहे.

निफाड (नाशिक) : तालुक्याची द्राक्षपंढरी असलेल्या पिंपळगांव ब सुकेणे उगांव, वनसगांव शिवडी, खडकमाळेगांव, सारोळे, सावरगांव, रानवड, सोनेवाडी परिसरात द्राक्षबागांच्या खरड छाटण्यांनी जोर धरला आहे. मात्र वाढत्या तपमानामुळे नविन फुटव्याला विलंब होत आहे.

निफाड तालुक्यात द्राक्ष हंगाम आटोपला आहे. द्राक्षमालाचा अखेरच्या टप्यात असलेला तुटवडा बाजारभाव वाढवून गेला. मात्र शेतकऱ्यांकडे द्राक्षमाल उपलब्ध नसल्याने‌ सामान्य द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही. द्राक्षमाल काढणीनंतरचा एप्रिल ते आॅगस्ट सप्टेंबर पर्यंतचा काळ हा द्राक्षवेलीच्या विश्रांतीचा काळ असतो त्यासाठी द्राक्षवेलीची खरड छाटणी केली जाते. सध्या द्राक्षपंढरीत खरड छाटण्यांचा उरक वाढला आहे. मात्र छाटणी केलेल्या द्राक्षबागांत नव्याने येणारा फुटवा हा विलंबाने तर काहीसा अनियमित होत असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या पुढील हंगामातील उत्पादनाचा पाया ढिला झाला आहे.

द्राक्षबागांचा हंगाम आटोपल्यानंतरचा चार पाच महिन्याचा कालावधी हा विश्रांतीचा काळ असतो या काळात द्राक्षबागेस सेंद्रिय खतांची मात्रा टाकुन वेली सुदृढ करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असते यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली असल्याने फुटवा सुरळीत होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामातील पीक उत्पादनाच्या नियोजनाचा पाया भक्कम करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे.

- बाबुराव सानप 
द्राक्ष उत्पादक सोनेवाडी खुर्द ता निफाड 

द्राक्षबागांत छाटणीनंतर टाकावु काड्या किंवा ऊसाचे चिपाड हे बुंध्यावर टाकुन वाढत्या उन्हापासुन संरक्षण केले जात आहे विहिरी बोअरवेलच्या पाण्यावर ठिबक सिंचनाद्वारे द्राक्षबागेला पाणी द्यावे लागत आहे पाणी शक्यतो सकाळी लवकर किंवा रात्रीच्या वेळेस द्यावे लागते कारण उन्हाच्या तीव्रतेने शेतात पाण्याचे  बाष्पीभवन वाढत आहे.

- छोटुकाका पानगव्हाणे
द्राक्ष उत्पादक उगांव

द्राक्षपंढरीतील हंगाम आटोपल्याने रोजगारही मंदावला आहे द्राक्षबागेची छाटणी करणे,काड्यांची बांधणी करणे,सपकेन करणे,यासारखीच कामे सुरु आहेत कडक उन्हामुळे शेतीकामांच्या वेळाही बदलुन गेल्या आहेत सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन वाजेपावेतो शेतकरी कामगार दाट सावलीतील व्रुक्षाखाली विश्रांती घेत सकाळी लवकर व सायंकाळी उशीरापावेतो कामे करत असताना दिसत आहेत.

Web Title: grapes farm affected by summer