नैसर्गीक स्त्रोतांची बचत करणारा ‘ग्रीन बिल्डिंग’ प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

‘एसएसबीटी’ महाविद्यालयाचा उपक्रम; वीज, पाण्याची होणार बचत
जळगाव - अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करणाऱ्या ‘ग्रीन बिल्डिंग’च्या कार्यक्षमतेच्या मूल्यमापनाचा यशस्वी प्रकल्प बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे, यामुळे नैसर्गीक स्त्रोतांची बचत होण्यास मदत होईल. 

‘एसएसबीटी’ महाविद्यालयाचा उपक्रम; वीज, पाण्याची होणार बचत
जळगाव - अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करणाऱ्या ‘ग्रीन बिल्डिंग’च्या कार्यक्षमतेच्या मूल्यमापनाचा यशस्वी प्रकल्प बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे, यामुळे नैसर्गीक स्त्रोतांची बचत होण्यास मदत होईल. 

मर्यादित प्रमाणात साठा असणाऱ्या पारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या भरमसाठ वापरामुळे भविष्यात जगापुढे होणाऱ्या ऊर्जा निमिर्तीच्या आव्हानाला पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करणे गरजेचे आहे. जळगाव सारख्या उष्ण तापमान असलेल्या भागातील घराच्या भिंतीसाठी वेगळा पर्याय म्हणून ‘कॅव्हिटी वॉल‘चा उपयोग केल्यास घरातील तापमान कमाल ३५% कमी होते. त्यामुळे घरात एसी सारख्या उपकरणाची आवश्‍यकता भासत नाही. सौर ऊर्जेपासून केव्ही क्षमतेच्या सोलर पॅनल मुळे तयार होणाऱ्या विजेच्या वापरामुळे कमाल ५०-६०% विजेची बचत होते. दरवर्षी सरासरी ६९१ मी. मी. पर्जन्यवृष्टी होत असल्याने पावसाच्या पाण्याचा एकही थेंब वाया जावू न देता, संपूर्ण पाणी कूपनलिकेद्वारे जमिनीत सोडून पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते, अथवा तेच पाणी इतर कामांसाठी उपयोगात आणता येते. वास्तुशास्त्रानुसार खिडक्‍या आणि दरवाज्यांची रचना केल्यास हवा खेळती राहते आणि दिवसा सूर्य प्रकाशाच्या वापरामुळे विजेची बचत होत असल्याचे या प्रयोगाद्वारे समजते.

दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थी रजनीश कुमार, दीपक वाघ, लक्ष्मण भोयेवर, कृष्णा शिंदे, अरुण इसापुरे यांनी विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. हुसेन यांच्या सहकार्याने तर प्रा. फारूक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग्रीन बिल्डींग’ कार्यक्षमता मूल्यमापनाचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला.

काय आहे ‘ग्रीन बिल्डिंग’

एसएसबीटी महाविद्यालयातील काही मुलांनी शहरातील बिल्डिंगचा सर्व्हे केला त्यात त्यांनी एक बिल्डिंग निवडली व त्यात काही बदल केले जसे की, बाथरुममधील पाणी एका टाकीत जमा करुन ते स्वच्छ करुन झाडांना मिळेल अशी सुविधा केली, सोबतच सोलर सिस्टिम वापरली, पावसाचे पाणी साठवता यावे यासाठी एक ट्यूबवेल तयार करण्यात आले आहे. परीसरात मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्यात आली आहे.

‘ग्रीन बिल्डिंग’चे फायदे
 ग्रीन बिल्डिंग बांधकामाचा खर्च जरी सामान्य बिल्डिंगच्या खर्चापेक्षा ५% जास्त असला तरी, किमान ४ वर्षात परतफेड होते.
 पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर कमी होतो.
 विजेचा वापर कमी होतो. (विजेच्या बिलात ५०-६०% बचत होते.)
 पाणी संवर्धन होते.
 पाणी पातळीत वाढ होते. 

Web Title: green building project for natural source saving