सप्तश्रृंगी गडाने नेसला हिरवा शालू, भाविकांबरोबरच पर्यटकांना निसर्गसौदर्यांची भूरळ

दिगंबर पाटोळे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

वणी (नाशिक) - सह्याद्रीच्या पूर्व - पश्चिम पर्वतरांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० उंचीवर असलेला सप्तश्रृंगी गड हिरव्यागार भरझरी शालुने नटला असून, बहरलेल्या निसर्ग सौदर्यांची गडावर भाविकांबरोबरच पर्यटक, तरुणाईला भुरळ पडली आहे. 

वणी (नाशिक) - सह्याद्रीच्या पूर्व - पश्चिम पर्वतरांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० उंचीवर असलेला सप्तश्रृंगी गड हिरव्यागार भरझरी शालुने नटला असून, बहरलेल्या निसर्ग सौदर्यांची गडावर भाविकांबरोबरच पर्यटक, तरुणाईला भुरळ पडली आहे. 

जुन महिन्यात पावसाने पाच सहा दिवस वगळता पाट फिरवली होती. मात्र जुलै महिन्यात वीस पंचवीस दिवस समाधानकारक पाऊस झाल्याने तसेच चार पाच दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार  पावसामुळे गडावरील निसर्ग खूलले आहे. गडावरील दऱ्या खोऱ्यातील छोटे मोठे धबधबे प्रवाहीत होवून चहुकडे मनसोक्त बरसु लागले आहे. त्यातच बहरलेल्या वृक्षवेली,  उमलले रानफुले त्यातच दाट धुक्याची झालर
यामुळे गडावरील सृष्टी सौदर्य पर्यटकांबरोबरच भाविकांनाही मनमोहीत करीत आहे. त्यामुळे भक्तीमय व निसर्गमय असा दुहेरी वातावरणाच्या मिलापाचा सुखद आनंद लुटण्यासाठी तरुणायी सरसावली आहे. दरम्यान गडाच्या घाट रस्त्यावर डोंगराच्या कड्यावरुन कोसळणारे धबधब्या बरोबर लहाण मोठे दगड येत असल्यामुळे भाविक पर्यटकांनी धबधब्याखाली न जाता दुरवरुनच आंनद लुटण्याची आवश्यकता आहे. त्याच बरोबर घाट रस्त्यावर व पठारी भागात दाट धुके असल्याने भाविकांनी आपले वाहाने सावकाश व लाइट, साईड लॅम्प लावून चालवण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. गडावरील धोकेदायक दऱ्या कपऱ्यालगत तसेच धबधब्यांच्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा मोहासही लगाम घालण्याची आवश्यकता आहे. नांदुरी - सप्तश्रृंगी गड या घाट रस्त्यात यु टर्न ते धबधबा या दरम्यान छोट्या मोठ्या दरडी पडण्याच्या घटना होत असल्याने या भागात वाहाने घाटात थांबवू नये याबाबतच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभाग, सप्तश्रृंगी देवी न्यास व ग्रामपंचायतीने दिल्या आहेत. तसेच गडावरील प्रदक्षिणा मार्ग सर्वात धोकेदायक असून हा मार्ग गेल्या पाच वर्षांपासून बंद करण्यात आला आहे. तरीही काही भाविक नजरचुकवून या भागात शिरकाव करतात. या मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात त्यामुळे भाविक व पर्यटकांनी प्रदक्षिणा मार्गावर न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: greenery on sanptashrungi gad nashik