निजामपूर-जैताणेत राष्ट्रपिता महात्मा फुले यांना अभिवादन

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणेत क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त आज (बुधवार) दोन्ही गावांतील ग्रामस्थांसह शाळा, महाविद्यालये, विविध राजकीय पक्ष, संघटना व सामाजिक संस्थांतर्फे आदरांजली वाहण्यात आली..

निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणेत क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त आज (बुधवार) दोन्ही गावांतील ग्रामस्थांसह शाळा, महाविद्यालये, विविध राजकीय पक्ष, संघटना व सामाजिक संस्थांतर्फे आदरांजली वाहण्यात आली..

सार्वजनिक जयंती-उत्सव समितीतर्फे प्रतिमापूजन, व्याख्यान व मिरवणूक...
जैताणे (ता. साक्री) येथील महात्मा फुले सार्वजनिक जयंती-उत्सव समितीतर्फे मंगळवारी (ता.१०) रात्री आठला जैताणेतील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ ऍड. राहुल वाघ (धुळे) यांचे 'महात्मा फुले व मानवतावाद' या विषयावर वैचारिक व प्रबोधनपर व्याख्यान झाले. सुरुवातीला फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवराय, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी ऍड. राहुल वाघ यांच्यासमवेत ऍड. प्रसेनजीत बैसाणे, ललित मोरे, दीपक जाधव, निलेश बोरसे, सत्यशोधक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. हिलाल महाजन, प्रकाश पाटील, सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज (ता.11) दुपारी चारला सावता चौकापासून गावातील मुख्य मार्गांवरुन फुलेंच्या अर्धाकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

आदर्श विद्या मंदिरात प्रतिमापूजन...
निजामपूर-जैताणे येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे फुलेंच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. संस्थेचे सचिव नितीन शाह, मुख्याध्यापक जयंत भामरे, उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, सुरेश माळी आदींसह ज्येष्ठ शिक्षक रामचंद्र सोंजे, पंडित जाधव, शोभा उपाध्ये आदींनी प्रतिमापूजन केले. ज्येष्ठ शिक्षक पी. जे. शाह, प्रा. भगवान जगदाळे, कन्हैयालाल चौरे आदींनी मनोगत व्यक्त केले.

निजामपूर ग्रामपंचायतीतर्फे अभिवादन...
निजामपूर ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा फुलेंच्या प्रतिमेस सरपंच साधना राणे, माजी उपसरपंच रजनी वाणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, माजी सरपंच अजितचंद्र शाह, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण वाणी, परेश वाणी, दीपक देवरे, कमलबाई मोरे, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव पवार, सामाजिक कार्यकर्ते रमेश वाणी, डॉ. रमाकांत शिरोडे, विशाल मोहने, डॉ. महेश ठाकरे, प्रकाश बच्छाव आदी उपस्थित होते.

जैताणे ग्रामपंचायतीत प्रतिमापूजन...
जैताणे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे आदींच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार, परशराम खलाणे, प्रकाश गवळे, राजेश बागुल, दौलत जाधव, आबा भिल, शानाभाऊ बच्छाव, गणेश देवरे, भगवान भलकारे, यादव भदाणे, सदा महाजन, जाकीर सय्यद आदी उपस्थित होते.

विविध शाळा व सामाजिक संस्थांतर्फे अभिवादन...
निजामपूर-जैताणेसह माळमाथा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत फुले जयंती साजरी करण्यात आली. त्यात आदर्श प्राथमिक विद्या मंदिर, आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल, भानुबेन वाणी पब्लिक स्कुल, इंदिरा गांधी कन्या विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, रामरावदादा पाटील आश्रमशाळा, अँग्लो उर्दू शाळा आदी शाळांसह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्था आदींचा समावेश आहे.

Web Title: Greetings to Mahatma Phule in Nizampur Jaitane