युतीबाबत गुलाबरावांची सुरेशदादांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

तालुका पातळीवर होत असल्यास युती करण्याचा संदेश

जळगाव - शिवसेनेचे नेते व माजी आमदार सुरेशदादा जैन यांची आज राज्याचे सहकारमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी भेट घेतली. जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. तालुका पातळीवर ज्या ठिकाणी युती होत असेल तर करावी अन्यथा स्वबळावर लढावे असा संदेश जैन यांनी दिला असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

तालुका पातळीवर होत असल्यास युती करण्याचा संदेश

जळगाव - शिवसेनेचे नेते व माजी आमदार सुरेशदादा जैन यांची आज राज्याचे सहकारमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी भेट घेतली. जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. तालुका पातळीवर ज्या ठिकाणी युती होत असेल तर करावी अन्यथा स्वबळावर लढावे असा संदेश जैन यांनी दिला असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सुरेशदादा जैन हे सध्या राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. शिवसेनेचे उपनेते व राज्याचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील आज सकाळी अकराला सुरेशदादाच्या निवासस्थानी गेले होते. त्याबाबत माहिती देताना गुलाबराव पाटील म्हणाले, सुरेशदादा तीन चार दिवसापासून बाहेरगावी होते, जिल्ह्यातील युतीच्या घडामोडीबाबत त्यांच्याशी चर्चा झाली नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आपण आज आलो. आम्हीही कार्यकर्त्यांना माहिती देवून तालुक्‍यात होत असेल तर युती करावी असे कळविले आहे. 

म्हसावद बोरनार गटाचा पेच सुरेशदादाच सोडविणार
जिल्हा परिषद निवडणुकीत म्हसावद बोरनार गटाबाबत शिवसेनेत पेच निर्माण झाला आहे. या मतदार संघातून शिवसेनेतर्फे (कै.) भिलाभाऊ सोनवणे यांच्या पत्नी श्रीमती लीलाबाई सोनवणे व प्रभाकर सोनवणे इच्छुक आहेत. याच गटातून शिवसेनेतर्फे (कै.) भिलाभाऊ सोनवणे यांचे सुपूत्र पवन ऊर्फ पप्पू सोनवणे इच्छुक आहेत. त्यांनी मतदार संघात प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे उमेदवारी देण्याचा पेच आहे. प्रभाकर सोनवणे यांनी सुरेशदादा जैन यांची भेट घेतली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर आज सुरेशदादांशी चर्चा झाल्याचेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

जिल्हा पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक
निवडणूकीबाबत जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची उद्या (ता.२६) मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. ते म्हणाले, जिल्हा, तालुका प्रमुख व उपप्रमुखांची ही बैठक आहे. बैठकीला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. 

शिवसेनेचे तेरा उमेदवार घोषित
जिल्हा परिषद निवडणूकीसाठी शिवसेनेतर्फे तेरा उमेदवार जाहिर करण्यात आले आहेत. तालुकानिहाय उमेदवार असे : पारोळा : देवगाव -तामसवाडी- समीर वसंतराव पाटील, वंसतनगर शिरसोदे-रत्नाबाई रोहिदास पाटील, म्हसवे-शेळगाव-सुनील यशवंत पाटील, एरंडोल-विखरण, रिंगणगाव-नाना पोपट महाजन, रावेर-पाल,केल्हाळा- मानसी महेंद्र पवार, विवरा, वाघोदा-मुबारक उखर्डू तडवी, निंबोरा, तामसवाडी-भास्कर विठ्ठल पाटील, ऐनपूर,खिरवड- सुलोचना यशवंत पाटील

Web Title: gulabrao & sureshdada discussion on alliance