नाशिक - जलतरण तासिका घेणारी ‘गुरुकुल’ ही तालुक्यातील पहिली शाळा़

रोशन भामरे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : ‘माणूस घडविणारे गुरुकुल’ असे बोधवाक्य असलेल्या ‘गुरुकुल’ कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबरच नेहमीच उपक्रम घेणारी उपक्रमशील शाळाम्हणून कसमादे नाव असलेल्या गुरुकुलमध्ये चालू वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना जलतरण तलाव व संस्कार वर्गाची सोय केली असून शालेय अभ्यासक्रमाबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

तळवाडे दिगर (नाशिक) : ‘माणूस घडविणारे गुरुकुल’ असे बोधवाक्य असलेल्या ‘गुरुकुल’ कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबरच नेहमीच उपक्रम घेणारी उपक्रमशील शाळाम्हणून कसमादे नाव असलेल्या गुरुकुलमध्ये चालू वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना जलतरण तलाव व संस्कार वर्गाची सोय केली असून शालेय अभ्यासक्रमाबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

मुलांमध्ये अभ्यासाबरोबरच खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्याहीपेक्षा तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन गुरुकुल कॅम्पसचे अध्यक्ष प्रा. जितेंद्र आहेर यांच्या संकल्पनेतून शाळेत जलतरण तलावाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

शंभर बाय सतरा फुटाचा जलतरण तलावाचे बांधून तयार करण्यात आला व विद्यार्थ्यांना जलतरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.पोहणे हा केवळ शरीरालाच नव्हे तर मनाला देखील उल्हसित करणारा व्यायामप्रकार आहे. १८९६ मध्ये आधुनिक ऑलिंपिक खेळाना विद्यार्थ्यांना प्रारंभ झाल्यावर जलतरण तलावाची व पोहण्याच्या शर्यतीत लोकप्रियता वाढली व ग्रामीण भागातील देखील विद्यार्थांना पोहोण्याच्या स्पर्धामध्ये भाग घेता यावा व आवड निर्माण व्हावी म्हणून हा जलतर तलाव बांधण्यात आला व विद्यार्थ्यांना आपल्या शालेय  अभ्यासक्रमाबरोबर इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन तासिका जलतरणासाठी दिल्या जातात. असा उपक्रम घेणारी ‘गुरुकुल’ ही सटाणा तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे.

सध्याच्या धावपळीच्या युगात आपली भारताची परंपरा टिककून राहावी व संस्कृतीचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी ठेवण्यासाठी शाळेने आणखी एक पाऊल उचले असून शाळेत रोज एक संस्कार तासिका देखील घेतली जाते.असा उप्रकम राबवणारी गुरुकुल हि कसामादेतील पहिली शाळा असून हा संस्कार वर्ग घेण्यासाठी महंत ह.भ.प.भालचंद्र अनारे कीर्तनकार महाजारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी वर्षभरात विद्यार्थ्यांना संस्कार तासिकेत आपल्या वडिलधाऱ्या व्यक्तीशी कसे वागावे हे संत साहित्याच्या माध्यामतून ज्ञान देण्यात आले तसेच गीता अध्ययन, अभंग, गवळणी, संत चरित्र, सनावळ्या, दिनचर्या आदी गोष्टी घेऊन आपली भारतीय परंपरेचे संवर्धन व जतन करणारी ‘गुरुकुल’ ही कसामादेतील पहिली शाळा ठरली आहे.

‘गुरुकुल’ खमताणे ही, कसमादेतील एकमेव शाळा आहे की, जेथे भारताच्या परंपरेचे संवर्धन व जतन व्हावे त्यासाठी संस्कार वर्गासाठी महंत ह.भ.प. कीर्तनकार महाराजांची नियुक्ती करून रोज एक तासिका घेतली जाते.तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जलतरणाची आवड निर्माण व्हावी व पुढे जाऊन प्राविण्य मिळावे यासाठी इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या आठवड्यातून दोन जलतरण तासिका घेतल्या जातात व बाहेरील व्यक्तीसाठी समर कालावधील ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून,पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शिस्त व अनुशासन प्राप्त व्हावे यासाठी सेमी मिल्ट्री स्कूल सुरु होत आहे, असे गुरुकुल कॅम्पस खमतानेचे कुलगुरू प्रा. जितेंद्र आहेर यांनी सांगितले.  

Web Title: gurukul is first school which takes period of swimming