Dhule Crime News : चोपडा फाट्यावर 24 लाखांचा गुटखा जप्त| Gutkha worth 24 lakh seized at Chopda Phata dhule Dhule Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police inspector A. with seized Gutkha. S. Agarkar and colleagues.

Dhule Crime News : चोपडा फाट्यावर 24 लाखांचा गुटखा जप्त

Dhule News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोबाईल टॉवरच्या साहित्याआड गुटख्याची तस्करी करणारा आयशर ट्रक शहर पोलिसांनी जप्त केला. २६ एप्रिलच्या दुपारी केलेल्या या कारवाईत २४ लाख रुपयांच्या गुटख्यासह ४४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. (Gutkha worth 24 lakh seized at Chopda Phata dhule Dhule Crime News)

पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना गुटखा तस्करीबाबत माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून शोधपथकाचे हवालदार ललित पाटील व सहकाऱ्यांनी सापळा रचला. कळमसरे (ता. शिरपूर) येथील चोपडा फाट्यावर इंदूरकडून शिरपूरकडे येणाऱ्या आयशर (एचआर ४६, ई १९६९)चा संशय आल्याने पोलिसांनी चालकाला थांबविले.

ट्रकच्या मागील भागात मोबाईल टॉवरच्या सुट्या भागात दडवलेल्या गुटख्याच्या गोणी आढळल्या. शहर पोलिस ठाण्यात आणून त्यांची मोजणी केल्यावर एकूण २४ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. ट्रकसह मुद्देमालाची किंमत ४४ लाख रुपये आहे. चालक अशोक आजादसिंग बडख (वय ३४, रा. बाळंद, ता.जि. रोहतक, हरियाना) याला अटक करण्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अन्नसुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक गणेश कुटे तपास करीत आहेत.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. एस. आगरकर, उपनिरीक्षक गणेश कुटे, संदीप मुरकुटे, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, पोलिस नाईक मनोज पाटील, विनोद आखडमल, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, प्रवीण गोसावी, सचिन वाघ, भटू साळुंके, मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार, शरद पारधी यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Dhulepolice