VIDEO : डर के आगे जीत है ! 'त्यांनी' अवघड मोहीम केली फत्ते..

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

अंगठ्याच्या आकाराचा उत्तुंग सुळका आहे याला लोक 'हडबीची शेंडी', ‘थम्स अप’, 'अंगठ्याचा डोंगर' असेही म्हणतात. दुरूनच लक्ष वेधून घेणारा हा १२० फुटांचा सरळसोट सुळका सर करण्याची प्रत्येक गिर्यारोहकांची इच्छा असते. हडबीची शेंडी हे सरळसोट अवघड डोंगर टोक आहे ही शेंडी सर करायचीच या इराद्याने अनेकजण या मोहिमेत सहभागी झाले.

नाशिक : मनमाड जवळ असलेला अंगठ्याच्या आकाराचा उत्तुंग सुळका ज्याला  'हडबीची शेंडी', ‘थम्स अप’,'अंगठ्याचा डोंगर' नावाने ओळखल्या जाणाऱ्या १२० फुटांचा सरळसोट सुळक्याच्या माथ्यावर आरोहण करत पहिला मान मिळविण्याची संधी मनमाडकर म्हणून प्रवीण व्यवहारे, सकाळचे पत्रकार अमोल खरे, डॉ भागवत दराडे, अनिल निरभवणे, निलेश वाघ, गुरू निकाळे, तुषार गोयल, धनंजय भामरे, सुमंत अंबर्डेकर आदींच्या समूहाला मिळाली नाशिकच्या पॉईंट ब्रेक अडव्हेंचर समूहाच्या माध्यमातून आरोहण मोहीम राबविण्यात आली होती 

Image may contain: one or more people, outdoor and nature

मनमाडकर म्हणून आरोहण करण्याचा पहिला मान !                  

अगदी अंगठ्याच्या आकाराचा उत्तुंग सुळका आहे याला लोक 'हडबीची शेंडी', ‘थम्स अप’, 'अंगठ्याचा डोंगर'असेही म्हणतात. दुरूनच लक्ष वेधून घेणारा हा १२० फुटांचा सरळसोट सुळका सर करण्याची प्रत्येक गिर्यारोहकांची इच्छा असते. हडबीची शेंडी हे सरळसोट अवघड डोंगर टोक आहे ही शेंडी सर करायचीच या इराद्याने प्रवीण व्यवहारे, सकाळचे पत्रकार अमोल खरे, डॉ भागवत दराडे, अनिल निरभवणे, निलेश वाघ, गुरू निकाळे, तुषार गोयल, धनंजय भामरे, सुमंत अंबर्डेकर, निर्भय, कृष्णा, सलोनी, मानसी,  नाशिकचे प्रमोद आहिरे आदींजण या मोहिमेत सहभागी झाले

Image may contain: sky and outdoor

पॉईंट ब्रेक अडव्हेंचर समूहाच्या माध्यमातून आरोहण ...

मनमाड जवळ असलेला अंगठ्याच्या आकाराचा उत्तुंग सुळका ज्याला  'हडबीची शेंडी', ‘थम्स अप’,'अंगठ्याचा डोंगर' नावाने ओळखल्या जाणाऱ्या १२० फुटांचा सरळसोट सुळक्याच्या माथ्यावर आरोहण करत पहिला मान मिळविण्याची संधी मनमाडकर म्हणून प्रवीण व्यवहारे, सकाळचे पत्रकार अमोल खरे, डॉ भागवत दराडे, अनिल निरभवणे, निलेश वाघ, गुरू निकाळे, तुषार गोयल, धनंजय भामरे, सुमंत अंबर्डेकर आदींच्या समूहाला मिळाली नाशिकच्या पॉईंट ब्रेक अडव्हेंचर समूहाच्या माध्यमातून आरोहण मोहीम राबविण्यात आली होती

नाशिकच्या पॉईंट ब्रेक अडव्हेंचर समूहाचे जॅकी साळुंखे, तुषार पाटील, चेतन शिंदे,अमोल तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठ वाजता मोहिमेला सुरुवात झाली. सकाळच्या बोचऱ्या थंडीत चढाई सुरू झाली. पायथ्यापासून शिखराच्या माथ्यापर्यंत आरोहण करताना काही ठिकाणी मेखा, पाचरी यांच्या साह्याने दोर लावून इतर सहकाऱ्यांना आरोहणाचा मार्ग सुकर केला. शिखर सर करताना सुळक्याचा खडक बराच सैल व निसरडा असल्यामुळे माती व खडक निसटत असतानाही अनुभवाच्या जोरावर  गिर्यारोहकांनी भर उन्हात शिखर सर केले.

Image may contain: 7 people, people smiling, sky, outdoor and nature

मनमाडकर म्हणून हडबीच्या शेंडीवर आरोहण करण्याचा पहिला मान या समूहाला लाभला शिखर माथ्यावर जाताच सर्वांनीच एक थरारक अडव्हेंचर अनुभवले अभिमानाची गोष्ट अशी की तांत्रिक दृष्टीने अवघड अशा या सुळक्यावर यशस्वी रित्या चढाई करून सुळक्याच्या माथ्यावर जाऊन या सर्व साहसवीरांनी  मनमाडच्या शिरपेचात एक  मानाचा तुरा नक्कीच रोवला आहे 

Image may contain: 1 person, standing, sky, child, tree, mountain, shoes, shorts, outdoor and nature


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hadbichi Shendi Mountain climbing at Nashik Marathi News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: