बदलत्या जीवनशैलीने अकाली टक्कल

प्रशांत कोतकर
सोमवार, 17 जून 2019

प्रचलित गैरसमजुती

  • कोंडा असताना तेल लावणे
  • केसगळती होऊ लागल्यास सलूनमध्ये जाऊन ब्लोड्राय अथवा हेअर स्ट्रेटनिंग, हेअर स्पा करणे
  • ओल्या केसांमध्ये कंगवा फिरविणे 
  • विविध प्रकारचे शाम्पू वापरणे
  • केसगळती थांबावी म्हणून टक्कल करणे
  • केसगळती थांबावी म्हणून कंडिशनर न वापरणे
  • केसगळतीचे औषधोपचार घेतल्यास वजन वाढणे
  • केसवाढीसाठी लसून व कांद्याचा ज्यूस/रस लावणे 

नाशिक - बदलत्या जीवनशैलीचा लोकांच्या केसांवर परिणाम जाणवत असून, अकाली टक्कल पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्वचारोग तज्ज्ञांच्या ‘स्किन अँड कॉस्मेटिक्‍स जर्नल’मध्ये याबाबत माहिती आली असून, त्यातील अहवालानुसार दर १० जणांमागे ६.७ जणांमध्ये केसगळती होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे केसगळती ही आता सार्वत्रिक समस्या 
बनली आहे. 

धकाधकीच्या जीवनात अवेळी झोप अन्‌ अवेळी जेवण, खाण्यात जंकफूडचे प्रमाण अधिक यामुळे केसगळती होत असल्याचे जागतिक पाहणीत दिसून आले आहे. यात उपायांपेक्षा अपायांनाच अधिक निमंत्रण दिले जात असल्याचाही प्रकार दिसून आला आहे. त्यात गैरसमजुतीच अधिक असल्याचे प्रामुख्याने पाहणीत आढळून आले आहे.

उपाय
    कोंडा असेल तर तेल लावू नये
    अँटीडॅन्ड्रफ शाम्पू वापरावा
    ब्लोड्राय, हेअर स्पा आदी प्रयोग करू नये (वैद्यकीय सल्ला आवश्‍यक)
    ओले केस नैसर्गिकरीत्या कोरडे होऊ द्यावे
    केसांना साजेसा (सूट होईल) असा शाम्पू व कंडिशनर वापरावा
    केस गळतीसाठी वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार आवश्‍यक
    पोषक द्रव्ये असणाऱ्या औषधांचा सेवनाने केस गळतीवर नियंत्रण
    केसगळती ते नवीन केसांची वाढ, यात ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागतो. याकरिता घाईचा उपचार करू नये. 

योग्य दैनंदिनी, सकस आहार, फळ, हिरव्या पालेभाज्या, सॅलेड, प्रथिनांचा आहारात योग्य वापर केल्यास केसांचेच नव्हे, त्वचेचेदेखील सौंदर्य खुलते. 
- डॉ. सचिन येवले, त्वचा व कॉस्मेटिक सर्जन, नाशिक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hairfall Lifestyle