एचएएल कामगार संपावर   

hall.jpg
hall.jpg

ओझर : गेली ३४ महिने प्रलंबित वेतन कराराच्या रास्त मागणीसाठी ऑल इंडिया एचएएल को-ऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने बेमुदत संपावर जाण्याचे निश्चित करण्यात आले. लखनऊ येथे झालेल्या कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लढाऊ विमाननिर्मिती करणाऱ्या देशभरातील एकूण नऊ प्रभागातील जवळपास वीस हजार कर्मचारी आपल्या वेतनवाढीसंदर्भात गेली कित्येक महीने आंदोलन करत आहे. आज (ता.३०) नाशिक कामगार संघटनेच्या वतीने स्थानिक उच्च व्यवस्थापनासह, उपायुक्त श्रम नाशिक, विभागीय श्रम आयुक्त मुंबई, यांना संपाची नोटिस देण्यात आली . यावेळी संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते

तुटपूंजी वाढ व्यवस्थापन 
अधिकारी वर्गाच्या तुलनेत अतिशय तुटपूंजी वाढ व्यवस्थापन देऊ करत असल्याचे मत को-ऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने मांडण्यात आले. आस्थापनेप्रती कामगार प्रामाणिक असून जर कंपनी आर्थिक संकटात असेल तर अधिकारी वर्गाला दिलेली १ जानेवारी २०१७ पासून दिलेली वाढ बंद करावी आणि आर्थिक स्थिति उत्तम झाल्यावर अधिकारी आणि कामगार वर्गाची सोबत वेतनवाढ करावी अशी मागणी कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. परंतु कंपनीची आर्थिक स्थिती उत्तम असून केवळ कामगार वर्गाच्या रास्त मागणीवर व्यवस्थापन गदा आणत आहे.असे कर्मचा-यांचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com