महापालिका शाळांची संख्या निम्म्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जून 2016

जळगाव - महापालिकेच्या सहा शाळांचे समायोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता शाळांची संख्या निम्म्यावर आली आहे. विशेष म्हणजे सद्यःस्थिती कोणतेही शिक्षक अतिरिक्त नाहीत उलट उर्दू शिक्षकांची अठरा पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान 1 जुलैला महापालिका शाळांतील विद्यार्थ्याचा पटपडताळणी अहवाल सादर होणार नाही.

जळगाव - महापालिकेच्या सहा शाळांचे समायोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता शाळांची संख्या निम्म्यावर आली आहे. विशेष म्हणजे सद्यःस्थिती कोणतेही शिक्षक अतिरिक्त नाहीत उलट उर्दू शिक्षकांची अठरा पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान 1 जुलैला महापालिका शाळांतील विद्यार्थ्याचा पटपडताळणी अहवाल सादर होणार नाही.

नवीन शालेय वर्ष सुरू झाले आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटली असल्याने दरवर्षाप्रमाणे यंदाही काही शाळांचे समायोजन करण्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा क्रमांक 3, 10, 17,23,42 ,18 या सहा शाळांचे एकत्र समायोजन केले आहे. शाळां क्रमांक 18 वगळता इतर शाळांचे समायोजन झाले आहे. केवळ शाळा क्र. 18च्या समायोजनाचा वाद आहे. तो सोडविण्याचाही प्रयत्न सुरू आहे. महापालिकेच्या तब्बल 48 शाळा होत्या आता ही संख्या निम्मे झाली असून फक्त 24 शाळा आहेत.

अतिरिक्त शिक्षक नाही
महापालिकेच्या सहा शाळांचे समायोजन झाल्याने शिक्षक अतिरिक्त झाल्याबाबत माहिती देताना शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी व्ही.एस. महाजन सांगितले की, महापालिकेच्या सद्य स्थितीत मराठी माध्यमाच्या 14 तर उर्दू माध्यमाच्या दहा शाळा आहेत. त्यात एकूण 192 शिक्षक आहेत, त्यात मराठी माध्यमाचे 98 तर उर्दू माध्यमाचे 94 आहेत. समायोजन झाले असले तरी सद्यःस्थितीत एकही शिक्षक अतिरिक्त नाही. उलट उर्दू माध्यमाच्या 18 शिक्षकांची पदे रिक्त आहे.

साडेपाच हजार विद्यार्थी
महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी संख्या घटत असल्याचेही प्रशासन अधिकाऱ्यांनी मान्य केले. ते यावर्षी अद्यापही शाळांमध्ये प्रवेश सुरू आहेत. मात्र त्याला अल्प प्रतिसाद आहे. महापालिकेच्या शाळेत पहिली ते सातवी मराठी व उर्दू माध्यमाचे साडेपाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एक जुलैला शाळेची पटपडताळणी करण्यात येऊन त्यात प्रत्येक शाळांतील इयत्तानिहाय विद्यार्थी संख्या घेण्यात येईल.

तर मुख्याध्यापकावर कारवाई
पालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक अठराचे समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे त्याची कारवाई मुख्याध्यापकांनी करावयाची आहेत. त्यांनी त्याचे समायोजन करून अहवाल सादर करावयाचे आहे, अन्यथा मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात येईल अशी माहितीही प्रशा

Web Title: Half the number of municipal schools