Video : दिव्यांगांना मिळाला आयुष्याचा जोडीदार! पाहा

किरण सुर्यवंशी : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

माणसाला आयुष्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातल्या त्यात दिव्यांग असल्यास समस्यांची श्रृंखला वाढतच जाते. असाच संघर्ष करणाऱ्या अभोणा येथील वर निंबा दुसाने व हातगड येथील दिव्यांग वधू सुरेखा पवार यांचा आंतरजातीय विवाह दोन्ही परिवाराच्या संगनमताने व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मध्यस्थीने एका देवीच्या मंदिरात मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला. दोन्ही दिव्यांगाना एकमेकांच्या आधाराची गरज होतीच. हा आधार त्यांना मिळाल्याने त्यांचे डोळे पाणावले होते.

अभोणा : माणसाला आयुष्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातल्या त्यात दिव्यांग असल्यास समस्यांची श्रृंखला वाढतच जाते. असाच संघर्ष करणाऱ्या अभोणा येथील वर निंबा दुसाने व हातगड येथील दिव्यांग वधू सुरेखा पवार यांचा आंतरजातीय विवाह दोन्ही परिवाराच्या संगनमताने व सामाजिक कार्यकर्ते राकेश दुसाने, पुरोहित किरण पाठक, शांताराम पवार यांच्या मध्यस्थीने चणकापुर येथील चणकेश्वरी देवीच्या मंदिरात मिरवणूक, फटाके, बँड, सत्कार या सर्वाना फाटा देत मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत अगदी वेळेवर संपन्न झाला. दोन्ही दिव्यांगाना एकमेकांच्या आधाराची गरज होतीच. हा आधार त्यांना मिळाल्याने त्यांचे डोळे पाणावले होते. 

"माझा झुला तुला घे
तुझा झुला मला
आयुष्याच्या पारंबीला 
बांधू एक झुला"

आपल्या आयुष्याला अशीही नव्याने सुरुवात होईल असे स्वप्नांतही वाटत नव्हते. अशा भावनिक प्रतिक्रिया दोघांकडून मिळाल्या. यावेळी अभोणा येथील राम गल्लीतील सर्व रहिवासी तसेच अभोणा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ताराबाई पवार, हरिश्चंद्र देसाई, सोमनाथ सोनवणे, अशोक मुठे, देविदास खैरनार, देविदास जाधव, पंकज जाधव, राजू पवार, गणपत दुसाने, दादाजी पाटील, परेश दुसाने, उमेश दुसाने, जीवन सैंदाने, नंदकुमार थोरात, पृथ्वीराज जाधव, सुनिल खैरनार, रामभाऊ दुसाने, दिलीप दुसाने, चंद्रकांत दंडगव्हाळ, प्रा. किरण सूर्यवंशी, किसन पवार, सुनिल खरोटे, नंदकुमार विसपुते व दोन्ही परिवाराकडील आप्तेष्ट उपस्थित होते.

प्रतिक्रिया
" दिव्यांग वधू वरांसाठी जात पात न मानता मानवतेच्या दृष्टीने त्यांना आधार देण्याची आज गरज आहे. नवीन पिढीला एक चांगला संदेश देता येईल."- किरण पाठक, ध्यस्थ व पुरोहित, 

" हा विवाह संबंध जुळविल्याने एक मानसिक समाधान मिळाले. यातून समाजाने आदर्श घ्यावा व दिव्यांगाना सामाजिक , आर्थिक आधार देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे." -राकेश दुसाने, संयोजक व सामाजिक कार्यकर्ते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: handicap persons got partner for forever life