डॉक्‍टरांनी स्वखुषीने खेड्यात रुग्णसेवा करावी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नाशिक - जीवन यशस्वी होण्यासाठी डॉक्‍टरांनी सक्तीने नव्हे, तर स्वखुषीने खेड्यात वर्षभर रुग्णसेवा करायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी मंगळवारी येथे केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सोळाव्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते डॉ. आमटे यांना डी. लिट. ही पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी सन्मानाला उत्तर देताना डॉ. आमटे बोलत होते. विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या सोहळ्यासाठी प्रती-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, मंदाकिनी आमटे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे आदी उपस्थित होते.

नाशिक - जीवन यशस्वी होण्यासाठी डॉक्‍टरांनी सक्तीने नव्हे, तर स्वखुषीने खेड्यात वर्षभर रुग्णसेवा करायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी मंगळवारी येथे केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सोळाव्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते डॉ. आमटे यांना डी. लिट. ही पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी सन्मानाला उत्तर देताना डॉ. आमटे बोलत होते. विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या सोहळ्यासाठी प्रती-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, मंदाकिनी आमटे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे आदी उपस्थित होते. वैद्यकीय विविध विद्याशाखेतील गुणवत्ताप्राप्त 42 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. याशिवाय राज्यपालांनी 2015-16 मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि आंतरवासीयाता पूर्ण केलेल्या विविध विद्याशाखांमधील आठ हजार 887 विद्यार्थ्यांना पदवी आणि पीएच. डी. प्रदान केली. राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाच्या ई-लर्निंग सुविधेचे उद्‌घाटन करण्यात आले.

आमटे म्हणाले ""शहरामध्ये सुश्रुषेतून अनुभवासह आदर मिळत नाही. त्याची पूर्तता खेड्यात होते. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून रस्ते, वीज, आरोग्य सेवा नसलेल्या भागात आरोग्य सेवेच्या माध्यमातून सामाजिक कामाची सुरवात केली. अशा भागात शाळा सुरू केल्याने आदिवासींची मुले डॉक्‍टर, वकील, अभियंता झाले आहेत.''

गुणवत्तेवर आधारित प्रवेश
डॉ. प्रकाश आमटे यांच्या सेवाव्रताचा आदर्श घेऊन डॉक्‍टरांनी खेड्यात रुग्णसेवा द्यायला हवी, असे सांगून महाजन म्हणाले, की हुशार गरीब विद्यार्थ्यांना डॉक्‍टर होता, यावे या दृष्टीने प्रणालीत बदल करण्यात येत आहे. अभिमत विद्यापीठांच्या अडीच हजार जागांबद्दल अनियमितता आहे. त्यामुळे गुणवत्तेवर आधारित प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला.

कुटुंबातील पहिली उच्चशिक्षित मुलगी
धुळ्याच्या जवाहरलाल फाउंडेशनच्या ए. सी. पी. एम. वैद्यकीय महाविद्यालयाची सुशीलासिंग कैकाडे हिने सुवर्णपदकाची "हॅट्ट्रिक' केली आहे. कुटुंबातील ती पहिली उच्चशिक्षित मुलगी आहे. तिचे वडील उत्तर प्रदेशातील असून यंत्रसामग्री दुरुस्तीचा व्यवसाय करतात. त्यांचे आठवीपर्यंत शिक्षण झाले. सुशीलाचे पती औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात अध्यापक आहेत. आपल्या लेकीचे अन्‌ स्नुषेचे कोडकौतुक पाहण्यासाठी आई-वडिलांसह सासू-सासरे सोहळ्यासाठी उपस्थित होते. सुशीला हिला शल्यचिकित्सेमधील पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे.

Web Title: At the hands of the governor D. Litt. degree awarded