सटाणा शहर व तालुक्यात 'बजरंग बली'च्या जयजयकारांनी मंदिरांचा परिसर दणाणला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

सटाणा : शहर व तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये दिवसभर जन्मोत्सव, महाआरती, महाप्रसाद याबरोबरच धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी आज शनिवार (ता.३१) रोजी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 'पवनसूत हनुमान की जय', 'सीयावर रामचंद्र की जय', 'जय – जय हनुमान हो स्वामी' अशा जयजयकारांनी मंदिरांचा परीसर दणाणून गेला होता.

सटाणा : शहर व तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये दिवसभर जन्मोत्सव, महाआरती, महाप्रसाद याबरोबरच धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी आज शनिवार (ता.३१) रोजी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 'पवनसूत हनुमान की जय', 'सीयावर रामचंद्र की जय', 'जय – जय हनुमान हो स्वामी' अशा जयजयकारांनी मंदिरांचा परीसर दणाणून गेला होता.

पहाटेपासूनच शहरातील पिंपळेश्वर रोड, श्री यशवंतराव महाराज मंदिर, श्री यशवंत व्यायामशाळा व न्यायालय आवारातील हनुमान मंदिरांमध्ये ध्वनिक्षेपकावर श्री हनुमान चालीसा व हनुमान स्तोत्र व भजने सुरु असल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

श्री हरी ओम पतसंस्थेतर्फे शहरातील सर्व हनुमान मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हनुमान चालीसा पुस्तिकेचे मोफत वितरण करण्यात आले. सर्व मंदिरे व सामाजिक मित्र मंडळांतर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. शेकडो हनुमान भक्त व नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

आज पहाटे ४.३० वाजता येथील नायालय आवारातील संकटमोचन हनुमान मंदिरात न्यायाधीश पवन तापडिया व सहन्यायाधीश व्ही. ए. आव्हाड यांच्या हस्ते महारुद्राभिषेक व महाआरती करण्यात आली. बागलाण वकील संघ आणि न्यायालय प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादानुसार या हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुरोहित भानुदास कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने मालेगाव ब्लड बँक व वकील संघातर्फे मोफत रक्त तपासणी आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ.दिग्विजय शहा, न्यायाधीश श्री. तापडिया व श्री. आव्हाड यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात डॉ.दिलीप भावसार, डॉ.शोभा सुमराव, डॉ.निवृत्ती सोनवणे, दादाजी क्षेत्रे यांनी दिवसभरात ७०० नागरिकांच्या मोफत रक्त तपासणी केल्या.

यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे, किशोर भांगडिया, ऍड. पंडितराव भदाणे, ऍड. हिरामण सोनवणे, ऍड. सोमदत्त मुंजवाडकर, ऍड. आर. जे. पाटील, ऍड. सतीश चिंधडे, डॉ.शशिकांत कापडणीस, उमेश सोनी, ऍड. ए. एल. पाटील, ऍड. सी. एम. सावंत, ऍड. नरेंद्र टाटीया, ऍड. सी. एन. पवार, ऍड. नाना भामरे, ऍड. मनीषा ठाकूर, ऍड. सुजाता पाठक, ऍड. पी. के. गोसावी, ऍड. वसंतराव सोनवणे, ऍड. यशवंत पाटील, ऍड. के.टी. ठाकरे, ऍड. व्ही. बी. सोनवणे, ऍड. नंदू सोनवणे, नंदलाल अहिरे, अजय पगार, रवींद्र गरुड, माधव राऊत, संजय कापसे, प्रदीप भांगडिया, हेमचंद्र सोनग्रा, सुनील टाटीया, अशोक बडजाते आदींसह भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.

येथील दोधेश्वर नाक्यावरील (कै.) पं.ध.पाटील चौकात बांधकाम ठेकेदार संघटना व दोधेश्वर नाका रिक्षा युनियनतर्फे आयोजित हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमात नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते बजरंगबलीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी नगरसेविका सुनिता मोरकर, दीपक पाकळे, महेश देवरे, संघटनेचे अध्यक्ष नाना मोरकर, पंचायत समिती सदस्य माणिक अहिरे, वसंत बगडाणे, किरण पवार, बापू कार्डीवाल, लालसिंग राजपूत, पंडित पगार, पवन पंडित, सुनील ठाकूर, प्रवीण रामोळे, सुरजन राजपूत, सीताराम चव्हाण, खंडू दात्रे, नथू वाघ, भाऊसिंग वाघ, रमेश भामरे आदींसह भाविक उपस्थित होते. 

Web Title: Hanuman Jayanti celebrated across Satana city