Dhule News : हरभऱ्या‍ची होते रस्त्यावरच काढणी | Harbhara was harvested on road dhule news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule News : हरभऱ्या‍ची होते रस्त्यावरच काढणी

Dhule News : हरभऱ्या‍ची होते रस्त्यावरच काढणी

Dhule News : उन्हाळी बागायती हरभरा, गहू, मका, बाजरीची काढणी पूर्णत्वास आली आहे. काही शेतकऱ्यांनी अद्यापही हरभऱ्याची काढणी शेष ठेवली आहे. (Harbhara was harvested on road dhule news )

त्यांनी कोरड्या झालेल्या हरभऱ्याचे पीक रस्त्यावर टाकून काढणीचा पारंपरिक प्रकार कायम ठेवला आहे. जिल्हा महामार्गासह राज्य महामार्गावर हरभरा, उडीद व मुगाचे पीक टाकून काढणीचे काम काही शेतकरी करतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वाहनांच्या जाण्या-येण्याने ही काढणी करून घेतात. यामुळे दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार घडतात. रस्त्यावरील काढणी बंद व्हायला हवी, अशी अपेक्षा वाहनधारकांमधून व्यक्त होत असते.

टॅग्स :Dhulecrops