PHOTOS : सहाय्यक निरीक्षक बडे यांच्या बदलीविरुध्द नागरिक रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 1 डिसेंबर 2019

हरसुल सारख्या संवेदनशील पोलीस स्टेशनला येऊन गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यात यश मिळवले . तर जनतेतही पोलीसांबद्दल आत्मीयता वाढवून सामान्य जनतेत लोकप्रिय झाले. त्याचाच परिणाम आज (ता.१) दिसला. आज दिवसभर हरसूल बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन तर रस्त्यावर उतरूनही बडे यांच्या बदलीचा निर्णय रद्द करावा. यासाठी पोलिस ठाण्यासमोर दिवसभर धरणे आंदोलनही केले.

नाशिक : हरसुलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी बडे यांच्याबदलीचा आदेश हरसुलकरांना जिव्हारी लागला असुन आज त्यांनी पबली आदेशा विरुध्द रस्त्यावरः येत कडकडीत बंद पाळला. 

 हरसूलकरांचा कडकडीत बंद 

हरसूलमध्ये आज (ता.१)  शिवाजी बडे यांच्यासाठी व पोलिसांच्या समर्थनार्थ व्यापारी व ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. चिडलेल्या हरसुल परिसरातील ग्रामस्थांनी रात्री उशिराच हरसुल पोलीस स्टेशनला आंदोलनाचा इशारा दिला व त्याला पाठिंबा हरसुल व्यापारी असोसिएशनने देत बंद पुकारला. 

Image may contain: sky, motorcycle and outdoor

photo : सपोनि शिवाजी बडे यांची बदली रद्द करावी यासाठी ठेवण्यात आलेले हरसूल कडकडीत बंद

हरसुल सारख्या संवेदनशील पोलीस स्टेशनला येऊन गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यात यश मिळवले . तर जनतेतही पोलीसांबद्दल आत्मीयता वाढवून सामान्य जनतेत लोकप्रिय झाले. त्याचाच परिणाम आज (ता.१) दिसला. आज दिवसभर हरसूल बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन तर रस्त्यावर उतरूनही बडे यांच्या बदलीचा निर्णय रद्द करावा. यासाठी पोलिस ठाण्यासमोर दिवसभर धरणे आंदोलनही केले.

Image may contain: one or more people and people standing

यावेळी ग्रामस्थ व व्यापारी यांच्या वतीने नायब तहसिलदार राठोड यांना निवेदन दिले. जोपर्यंत बदली रद्द होत नाही तोपर्यंत हरसुल व्यापारी बेमुदत दुकाने बंद ठेवतील. असा इशारा अध्यक्ष विठ्ठल भोये व व्यापाऱ्यांनी दिला. 
 
Image may contain: one or more people

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harsul,s Citizens on road against the transfer of Assistant Police Inspector Nashik News