हस्ती स्कूलला ‘आयएसओ ९००१-२०१५’ मानांकन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

दोंडाईचा - येथे पंधरा वर्षांपासून दर्जेदार व गुणवत्तायुक्त इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यात अग्रेसर हस्ती पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाला ‘आयएसओ ९००१-२०१५’ मानांकन प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले. इंटरनॅशनल ॲक्रिडिएशन फोरमशी संलग्न आरओएचएस सर्टिफिकेशन प्रा. लि.तर्फे नवी दिल्लीच्या इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड रजिस्ट्रेशन संस्थेकडून हे प्रतिष्ठेचे मानांकन मिळाल्याने असे मानांकन मिळविणारी शहरातील ही एकमेव शाळा ठरली आहे.

या आयएसओ मानांकनासाठी इंटरनॅशनल स्टॅंडर्ड रजिस्ट्रेशन संस्थेने हस्ती स्कूलच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे लेखापरीक्षण केले. यासाठी नाशिक येथील पी थ्री मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे लीड कन्सल्टंट पी. एस. पाटील यांनी सहकार्य केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणे, गुणवत्तायुक्त अध्ययन-अध्यापन पद्धती, आदर्श दस्तावेज, शालेय इमारत, सायन्स लॅब, कॉम्प्युटर लॅब, मॅथ्स्‌ लॅब, लॅंग्वेज लॅब, सोशल स्टडी लॅब, ग्रंथालय, संगीत दालन, क्रीडा विभाग, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी दर्जेदार, मूलभूत शैक्षणिक सुविधांचे परीक्षण करण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, पर्यावरण संवर्धन या जाणिवांचे संस्कार रुजविण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम तसेच शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी व अध्यापन कार्य प्रभावी होण्यासाठी तज्ज्ञांचे उद्‌बोधन वर्ग व कार्यशाळा आणि पालकांसाठी व्याख्याने, मार्गदर्शन, समुपदेशन व उद्‌बोधन वर्गांचे आयोजन करणे या बाबींचेही निरीक्षण करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर शाळा ‘आयएसओ’ मानांकनास पात्र ठरली. शाळेचा गौरव वाढल्याने पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Hasti School get ISO 9001:2015 certification