म्हसाई माता महिला पतसंस्थेची 'दीपस्तंभ' पुरस्काराची हॅट्रिक

प्रा.भगवान जगदाळे
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, पुणे यांच्यातर्फे आयोजित सन 2018 या वर्षाच्या राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार स्पर्धेत माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील म्हसाई माता महिला पतसंस्थेने नाशिक विभागातून 'दीपस्तंभ' हा प्रथम पुरस्कार मिळवत हॅट्रिक साधली. सदर पुरस्काराचे वितरण बुधवारी (ता.26) लोणावळा (जि.पुणे) येथे विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा, काका कोयटे व संचालकांच्या शुभ हस्ते झाले.

पतसंस्थेचे संस्थापक लक्ष्मीकांत विरेंद्रलाल शाह, उपाध्यक्षा शैलेजा अनिल सोंजे, संचालिका योगिता लक्ष्मीकांत शाह, आशाबाई महेंद्र सूर्यवंशी व व्यवस्थापक निलेश रामदास जयस्वाल आदींनी हा प्रथम पुरस्कार स्विकारला. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनतर्फे दिला जाणारा हा मानाचा राज्यस्तरीय 'दीपस्तंभ प्रथम पुरस्कार' पतसंस्थेने सलग तिसऱ्यांदा प्राप्त करत हॅट्रिक साधली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर या पाचही जिल्ह्यातून पतसंस्थेने हा प्रथम पुरस्कार मिळवला.

"या पुरस्काराचे खरे श्रेय आमचे सर्व संचालक मंडळ, सल्लागार, मार्गदर्शक, सभासद, ग्राहक, ठेवीदार व हितचिंतक यांनाच जाते!"
- उर्मिलाबेन विरेंद्रलाल शाह, अध्यक्षा, म्हसाई माता महिला पतसंस्था.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hattrick Deep Sthambh award for Mhasai Mata Mahila Credit Society