ऑनलाइनच्या कामाला कंटाळून मुख्याध्यापकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मनमाड - मनमाड येथील विवेकानंदनगरमध्ये राहणारे मुख्याध्यापक मुकुंददास शोभावंत (वय 54) यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या केली. ऑनलाइन कामाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्यांच्या खिशात पोलिसांना आढळून आली.

मुकुंददास शोभावंत हे येथून जवळ असलेल्या मेसनखेडे (ता. चांदवड) येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. शोभावंत यांची पत्नी व मुली बाहेरगावी लग्नाला गेले होते. बुधवारी त्यांची मुलगी घरी आली असता, वडिलांनी आत्महत्या केल्याचे तिला आढळून आले. पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता, शोभावंत यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. ऑनलाइन कामाला व शाळेच्या बांधकामाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. शोभावंत यांचे मेहुणे राजेंद्र बैरागी यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

Web Title: headmaster mukunddas shobhawant suicide