काश्मीर खोऱ्यात धन्वंतरी दूतांची आरोग्य सेवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नाशिक - काश्मीर म्हटले की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच आपल्या डोळ्यासमोर येते परंतु अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथिल जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे हा एकच हेतू डोळ्यासमोर ठेऊन, केवळ चर्चा न करता कृती करणारे उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टर्स काश्मिरातील सीमावर्ती भागात वैद्यकीय सेवा देण्याचे अनमोल कार्य दरवर्षी करत आहेत.

नाशिक - काश्मीर म्हटले की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच आपल्या डोळ्यासमोर येते परंतु अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथिल जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे हा एकच हेतू डोळ्यासमोर ठेऊन, केवळ चर्चा न करता कृती करणारे उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टर्स काश्मिरातील सीमावर्ती भागात वैद्यकीय सेवा देण्याचे अनमोल कार्य दरवर्षी करत आहेत.

दि.११ मे ते २० मे दरम्यान डॉ. धर्मेंद्र पाटील जळगाव, डॉ.अभिजित रामोळे, डॉ.नितीन शाहीर, डॉ.निकिता चंडोले, डॉ.सोहम चंडोले, डॉ.रेखा चंडोले, डॉ.विलास चंडोले, डॉ.योगेश पवार, डॉ.प्रभाकर बेडसे, डॉ.सतीश साळुंखे, डॉ.विवेक जोशी, डॉ.योगेश पंजे, श्री.ऋषिकेश परमार आदी हे या सेवाकार्यात सहभागी झाले आहेत. यामध्ये काश्मिरातील बांदीपुरा सेक्टर, अजस सेक्टर, संभल सेक्टर, बांदरगल सेक्टर, अशमुकम सेक्टर, नाहीदकाही सेक्टर, बारामुल्ला सेक्टर, द्रास, कारगिल या भागात वैद्यकीय सेवा देणार आहेत. सदरील शिबिराचे आयोजन डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशनच्या माध्यमातून व भारतीय सैन्य दलाच्या मदतीने केले आहे. भारतीय सैन्यदलाची या शिबिरासाठी मान्यता मिळाली असून, शिबिरासाठी लागणारी औषधे भारतीय सैन्यदल पुरविणार आहेत. असे 13 राष्ट्रीय रायफल बटालियनचे कॅप्टन डॉ.सुमित यांनी डॉ.धर्मेंद्र पाटील यांना कळविले आहे. 

त्या सोबतच जळगाव व नाशिक येथील डॉक्टरांचा चमू आपल्या सोबत एक लाख रुपयांची औषधी घेऊन जात आहे. डॉक्टरांच्या या समाज कार्याला 3 RR, 5RR, 13RR, 14RR, 24RR या राष्ट्रीय रायफल बटालियनच्या जवानांचे सहकार्य लाभणार आहे.

बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशनचे अधिक कदम संस्थापक असून, डॉ धर्मेंद्र पाटील हे या संस्थेचे समन्वयक आहेत. तसेच आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष असून, त्यांच्या साथीला ऋषीकेश परमार, नाशिक यांच्या मदतीने सुमारे ३०० अनाथ मुलींचा सांभाळ जम्मू, अनंतनाग, कुपवाडा, बिरवाह, श्रीनगर येथील अनाथालयात केला जातो. याआधीही या संस्थेद्वारे काश्मीरखोऱ्यात पुरग्रस्तस्थितीवेळी ४० डॉक्टरांच्या चमूने दीड महिना साडे तीन लाख रुग्णांना सेवेचा लाभ दिला आहे. तसेच गेल्या दशकापासून दरवर्षी काश्मीर खोऱ्यातील गरजूंसाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन केले जाते. 

या संस्थेने काश्मीर खोऱ्यात इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस सुरू केली असून, यासाठी १० अत्याधुनिक कार्डियाक अँम्बुलन्स काश्मीर खोऱ्यात कार्यरत आहेत. गेल्या वर्षी दगडफेकी दरम्यान, पॅलेट गन इंजुरी मुळे दृष्टी गमावलेल्या सुमारे ९०० रुग्णांवर देखील या संस्थेच्या वतीने श्रीनगर येथे डॉ. नटराजन आणि टीमने शस्त्रक्रिया केल्या. आर्या फौंडेशनचे तर्फे महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली जाते. तसेच बॉर्डरलेस वर्ल्ड फउंडेशन या संस्थेद्वारे अखलपूर, जम्मू येथे नुकतेच २०० मुलींसाठीचे भव्य अनाथालय उभारण्यास सुरुवात झालेली आहे. डॉ.धर्मेंद्र पाटील यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत डॉ.प्रकाश बाबा आमटे यांनी देखील त्यांचा गौरव केलेला आहे.

Web Title: health service in Kashmir valley