‘आरोग्य डॉट कॉम’ सर्वांसाठी उपयुक्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

‘सकाळ’च्या उपक्रमाचे नामांकित डॉक्‍टरांकडून स्वागत

धुळे - ‘सकाळ’च्या खानदेश आवृत्तीच्या तपपूर्तीनिमित्त ‘सकाळ आरोग्य. कॉम धुळे- नंदुरबार’ ही वैद्यकीय क्षेत्रातील ‘अपडेट’ सेवा-सुविधांविषयी प्रकाशित होत असलेली पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरेल. अशा विधायक उपक्रमाचा वसा घेतलेल्या ‘सकाळ’ने ही पुस्तिका तयार करून वैद्यकीय क्षेत्राविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यासाठी मोलाचा हातभार लावल्याची भावना या क्षेत्रातील नामांकित मान्यवरांनी आज येथे व्यक्त केली.

‘आयएमए’च्या सभागृहात सकाळी साडेअकराला ‘सकाळ आरोग्य. कॉम धुळे- नंदुरबार’ या पुस्तिकेचे ‘आयएमए’चे राष्ट्रीय नेते व धुळे शाखेचे अध्वर्यू डॉ. रवी वानखेडकर, ‘आयएमए’च्या धुळे शाखेच्या अध्यक्षा डॉ. विजया माळी, कार्याध्यक्षा डॉ. सविता नाईक, सचिव डॉ. पंकज देवरे, केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रवर्तक ज्ञानेश्‍वर भामरे, इन्स्टिट्यूट ऑफ युरॉलॉजीचे डॉ. आशिष पाटील, आस्था हॉस्पिटलचे डॉ. नोएल ब्रिटो, सिद्धेश्‍वर हॉस्पिटलचे डॉ. संजय संघवी, डॉ. विलास रेलन, डॉ. जितेंद्र ठाकूर, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. महेंद्र गिरासे, सिद्धी हॉस्पिटलचे डॉ. सुशील महाजन, ‘आयएमए’च्या यंग विंगचे राज्याध्यक्ष डॉ. भूषण चौधरी आणि शिवआरोग्य सेनेच्या राज्य निमंत्रक, निरामय हॉस्पिटलच्या डॉ. माधुरी बोरसे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. ‘सकाळ’च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा उपस्थित होते.

उपयुक्त उपक्रम

डॉ. वानखेडकर म्हणाले, की ‘सकाळ’ने प्रकाशित केलेली ही पुस्तिका उपयुक्त आणि उत्तम आहे. ‘सकाळ’ हे विधायक उपक्रमांना सदैव चालना देणारे आणि विचारांचा समतोल साधणारे अग्रणी वृत्तपत्र आहे. त्याने समृद्ध वाचकनिर्मितीचा घेतलेला वसा वाखाणण्याजोगा आहे. ‘आयएमए’देखील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध विधायक उपक्रमांतून प्रयत्नशील असते. डॉ. माळी यांनी ‘आयएमए’च्या धुळे शाखेच्या ‘मिशन पिंक हेल्थ’, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठीचे उभारी अभियान यासह विविध उपक्रमांची माहिती दिली. श्री. बुवा यांनी या प्रकाशित पुस्तिकेतून वैद्यकीय क्षेत्राशी निगडित उपयुक्त, ‘अपडेट’ माहिती निरनिराळ्या प्रकारे उपलब्ध केली असून, संग्राह्य कशी राहील, यादृष्टीने प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यांनी प्रास्ताविकात या पुस्तिकेसंबंधी भूमिका आणि ‘सकाळ’च्या वाटचालीची माहिती दिली. मान्यवर डॉक्‍टरांचे आभार मानले.

पुस्तिकेचे आज सर्वत्र वितरण

‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या ‘आरोग्य. कॉम’ या पुस्तिकेचे उद्या (ता. ११) मुख्य अंकासोबत मोफत वितरण करण्यात येणार आहे.

Web Title: 'Health.com' all appropriate